शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 06:05 IST

.. जे आज आहे, ते उद्या नसेल!! आजचा दिवस उद्या असणार नाही! काहीही झालं, तरी माणूस हिंमत हरणार नाही!!!

ठळक मुद्दे..हो! हे असं होईल!! पुन्हा एकदा सारं पहिल्यासारखं होईल. हा उदास, हताश काळ सरेल, आणि तुंबलेलं पाणी पुन्हा वाहतं होईल!

- राजेंद्र दर्डा


धावत्या शहरांच्या पायात
बेडी पडली आहे,
फिरत्या चाकांच्या पट्टय़ांवर
धूळ चढली आहे.

.पण हे टिकणार नाही.
आजचा दिवस उद्या असणार नाही. 
काहीही झालं, तरी 
माणूस हिंमत हरणार नाही!

रस्ते आहेत सुनसान.
माणसं बावरलेली,
मनातून घाबरलेली,
घरातघरांत कोंडून पडलेली!

दिवसांचं चैतन्य हरवलं आहे,
रात्रींची चमक ओसरली आहे.
.पण हे टिकणार नाही.
आजचा दिवस उद्या असणार नाही.
काहीही झालं, तरी
माणूस हिंमत हरणार नाही!

मंदिराचे गाभारे एकेकटे..
रमझानची सहेरी उदास,
इफ्तारची रौनक विझलेली!
..पण हे संपेल,
आज आहे तसं उद्या नसेल!

शेकडो मैल दूरच्या घराकडे 
चालत निघाले आहेत अनवाणी पाय!
असहाय्य बापाकडे दुसरा पर्याय नाही,
थकल्या आईचा जीव थार्‍यावर नाही,
भुकेल्या पोराच्या ओठी दुधाचा थेंब नाही!

- हा असा आहे का माझा देश?
इतका क्रूर?
इतका निर्दय?

- पण ही तडफड थांबेल.
वर्तमान बदलेल!
आजचा दिवस उद्या असणार नाही!
काहीही झालं तरी,
माणूस हिंमत हरणार नाही.

पुढे काय होणार?
कसं होणार?
जगल्या वाचल्या लोकांच्या वाट्याला
कसलं जग येणार?

हाताला काम असेल का?
भुकेला घास मिळेल का?

कधीतरी, पुन्हा स्वप्नं बघता येतील का?
सुखाने श्वास घेता येईल का?
शेजारच्या प्रत्येकाकडे संशयाने पाहणं,
कधीतरी थांबेल का?

कधीतरी पुन्हा एकदा
जीवलग मित्रांना 
घट्ट मिठी घालता येईल का?

..हो!
हे असं होईल!!
पुन्हा एकदा
सारं पहिल्यासारखं होईल.
हा उदास, हताश काळ सरेल,
आणि
तुंबलेलं पाणी पुन्हा वाहतं होईल!

कारण,
जे आज आहे,
ते उद्या नसेल!!
आजचा दिवस उद्या असणार नाही!
काहीही झालं, तरी
माणूस हिंमत हरणार नाही!!!

rjd@lokmat.com
(लोकमत वृत्त-समूहाचे एडिटर इन चिफ)