शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

रूपालीच्या घरात चोरी करणारी महिला गजाआड

By admin | Updated: May 2, 2015 10:21 IST

अभिनेत्री रुपाली गांगुली-वर्माच्या घरातून तब्बल ७१ लाखांचा ऐवज चोरणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने २४ तासांच्या आत गजाआड केले.

मुंबई : अभिनेत्री रुपाली गांगुली-वर्माच्या घरातून तब्बल ७१ लाखांचा ऐवज चोरणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने २४ तासांच्या आत गजाआड केले. उज्वला जाधव(३३) असे आरोपी महिलेचे नाव असून तिने चोरलेला ऐवज मालमत्ता कक्षातर्फे हस्तगत करण्यात आला आहे.रुपालीच्या घरी तिसऱ्या मोलकरणीची गरज होती. काहीशा घाईतच रुपालीने जाधवला आपल्या घरी कामावर ठेवून घेतले होते. जाधवने अवघ्या काही मिनिटांत रूपालीच्या दोन मोलकरणींसोबत मैत्री केली. त्या दोघींची नजर चुकवून जाधव रूपालीच्या बेडरूममध्ये शिरली आणि एकूण ७१ लाखांचा ऐवज घेऊन ती पसार झाली. काही वेळाने घरी परतलेल्या रूपालीला हा प्रकार लक्षात आला आणि तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान मालमत्ता विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन पाटील यांनी तत्काळ या इमारतीच्या परिसरातील काही सीसीटिव्ही चित्रण ताब्यात घेतले. मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ निरिक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पाटील आणि पथकाने तपास सुरू केला. एका महिला जाधवला काही दिवसांपुर्वी भेटली होती. तिने दिलेल्या माहितीनुसार पथकाने नातेवाईकांना ताब्यात घेत चौकशी केली. नातेवाईकांनी ही जाधव असल्याचे स्पष्ट केले. तसेच तिच्या वाकोल्यातल्या घराचा पत्ताही दिला. लगोलग पथकाने वाकोल्यात छापा मारून जाधवला अटक केली. चौकशीत तिने गुन्हा कबूल केला.