शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

"इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर..."; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:57 IST

विदर्भात येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव..तुम्ही आमच्यासाठी देवासमान आहात परंतु वर्तवणूक देवासारखी ठेवा, देणाऱ्याची ठेवा असा टोला मुनगंटीवार यांनी सरकारला लगावला.

नागपूर - हिवाळी अधिवेशनात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ, मराठवाडा वैधानिक विकास मंडळावरून सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.  ज्या विदर्भातील नागपूरला आपण देशाचं हृदय मानतो, त्यांचा विचार होत नसेल. विदर्भावर अन्याय करू नका. उद्योग असेल, रस्ते असतील सगळे पुणे, मुंबई विभागात जात असेल तर आम्ही करायचे काय...त्यामुळे विदर्भ वैधानिक मंडळ हे आमचे सुरक्षा कवच आहे असं सांगत मुनगंटीवारांनी सरकारवरच अन्याय करत असल्याचा आरोप केला आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विदर्भ वैधानिक विकास मंडळ हा आमचा हक्क आणि सुरक्षा कवच आहे. तुम्ही जर हे संरक्षक कवच काढून टाकले तर जो निधीचा उपयोग आहे तो विदर्भासाठी होणार नाही. नोकरीबाबत बोललं तर ते उत्तर येते वैधानिक विकास अस्तित्त्वात नसल्याने यावर भाष्य करू शकत नाही असं सांगितले जाते. निधीबाबतीत अर्थसंकल्पात दाखवताना समनिहाय वाटप दाखवले जाते पण तसा खर्च झाला का याची यादी मी मागितली तर त्यावर उत्तर येत नाही. त्यामुळे मी भूमिका मांडली. विदर्भात येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव..तुम्ही आमच्यासाठी देवासमान आहात परंतु वर्तवणूक देवासारखी ठेवा, देणाऱ्याची ठेवा. तुम्ही इथं येऊन हुरडा खाऊन परत जाल तर हे विदर्भातील जनतेवर अन्याय करणारे आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच ज्या विदर्भातील नागपूरला देशाचं हृदय म्हणतो, तिथे बसून आपण सर्वकष विचार केला नाही तर या विभागातील आमचे आदिवासी बांधव, अनुसुचित जाती जमातीतील लोक असती. जे गरीब लोक असतील, आजही ह्युमन इंडेक्समध्ये १२५ तालुक्यांपैकी ६० विदर्भातील आहेत. त्यामुळे आमच्यावर अन्याय करू नका. ११ लाख कोटीचे काम मुंबईकडे, पुण्याकडे दिले जाते मग आम्ही काय करायचे? त्यामुळे वैधानिक विकास मंडळ आमचे सुरक्षा कवच आम्हाला हवे यासाठी मी आमदारांच्या सहीचे पत्र सरकारला देणार आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

दरम्यान, विरोधी आमदारांना निधी देण्याएवढे मोठं मन सरकारचं नाही. मात्र जे सत्तेत आहेत तेदेखील खुश नसल्याचे दिसत आहे. अनेकांवर अन्याय सुरू आहे. काही ठराविक आवडत्या लोकांना शेकडो निधी मिळतो आणि नावडत्या लोकांना एक अंकी, दोन अंकी निधी दिला जातो. शेतकऱ्यांना शेवटपर्यंत मदत पोहचत नाही. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत पोहचली नाही अशा तक्रारी आहेत. लोकांच्या तक्रारी आमच्याकडे येतात त्यावर विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उचलतो. सरकार कितीही म्हणत असेल शेतकऱ्यांना निधी दिला मात्र लोकांचे समाधान झाले नाही असं सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही सरकारवर निशाणा साधला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Munugantiwar Warns Government: Don't Just Eat Hurda and Leave Vidarbha!

Web Summary : BJP's Munugantiwar criticized the government for neglecting Vidarbha's development. He demanded the Vidarbha Statutory Development Board remain a protective shield, ensuring fair resource allocation and preventing injustice to the region. He accused the government of favoring other regions.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाJayant Patilजयंत पाटील