शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणानेच आमच्या वेदना कमी होतील, ...तर दुपारी 2 वाजता भूमिका स्पष्ट करणार; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 01:09 IST

आपण सरकारी समितीमध्ये सहभागी होणार नाही. तसेच आंदोलनासंदर्भात आपण मंगळवारी दुपारी निर्णय घेऊ, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मुद्द्यावर आज सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन, सरकार मागणीवर कार्यवाही करत आहे. थोडा वेळ दिला पाहिजे. तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेण्याची विनंती करणारा ठराव या बैठकीत एकमताने पारित करण्यात आला. याशिवाय, या आंदोलनादरम्यान नागरिकांवर झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. तसेच, न्यायमूर्ती शिंदे समितीमध्ये जरांगे पाटील अथवा त्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येईल, असेही सांगितले. यावर, आपण सरकारी समितीमध्ये सहभागी होणार नाही. तसेच आंदोलनासंदर्भात आपण मंगळवारी दुपारी निर्णय घेऊ, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील - मनोज जरांगे म्हणाले, "आमचे कुणीही समितीमध्ये जाणार नाही. ना मी, ना आमच्यावतीने कुणी तज्ज्ञ अथवा महाराष्ट्रातील कुणी, आमच्या वतीने कुणीही जाणार नाही. सरकारनेच त्यांचे कुणी समितीत टाकायचे ते टाकावेत. आमच्या वतीने समितीत कुणीही जाणार नाही. तो मोहही आम्हाला नाही. आम्हाला एकच मोह आहे, तो म्हणजे, काहीही करा, पण मराठा समाजाला आणि त्या पोरांना आरक्षण द्या. एवढाच मोह आम्हाला आहे. समितीत जाण्याचा मोह आम्हाला नाही. त्यासंदर्भात आम्ही आमचे मत स्पष्ट केले आहे. त्यांनीच तज्ज्ञ टाकावेत आणि समाजाला न्याय द्यावा."

आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांसंदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, "अंतरवलीसह या आंदोलनात सर्वच खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. ते सर्व गुन्हे मागे घेण्यात आले असतील, तर आम्ही गावाच्या आणि मराठा समाजाच्या वतीने आम्ही कौतुक करतो आणि स्वागतही करतो."  

...तर आम्ही दोन पावलं मागे येऊ  -पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "मी कुणालाही भीत नाही, मी केवळ माझ्या समाजाला भीतो. माझे गावकरी जे भावणिक झाले आहेत मी केवळ त्याला दबतोय. माझ्या माता माऊल्या सगळ्याच गेल्या दोन तासांपासून रडत आहेत, संपूर्ण गाव विनंती करत आहे की, किमान सलाईन तरी घ्या, थोडं पाणी तरी घ्या. ते थोडं माझ्या काळजाला लागतंय. ते माय-बाप आहेत म्हणल्यावर त्यांचे ऐकावे की नाही, या दुविधा मनःस्थितीत आहे. माझ्यात निर्णय घेण्याची क्षमताच राहिली नाही. ते रडले नसते, भावणिक झाले नसते, तर मी आणखीही ताठर राहिलो असतो. काय करावे, सुचत नाहीय. पण बघुया, त्यांच्याकडूनही येईलच ना कुणीतरी आम्हाला सांगायला की, कशासाठी वेळ हवा,  का हवा, ते जबाबदारीने काम करणार आहेत का? आम्ही एक पाऊल मागे यायचं म्हणत आहेत, आम्ही दोन पावलं मागे येऊ. पण वेळ का आणि कशासाठी हवा हे आम्हाला कळायलाही हवे आणि तुम्ही खरोखरच करणार आहात का? हा महत्वाचा मुद्दा आहे."

आमच्यासाठी मुख्यविषय आरक्षण -"आमच्यासाठी मुख्यविषय आरक्षण आहे. त्यांनी आज झालेल्या विषयावर प्रत्यक्ष येऊन आमच्यासोबत चर्चा करावी. त्यांसा सांगावे की, आम्ही तुम्हाला टिकणारे आरक्षण एढ्या दिवसांत देणार, मी आणि माझा मराठी समाज मंगळवारी लगेच बैठक घेतो आणि त्यांना सांगतो. एक पाऊल काय आम्ही दोन पाऊले  मागे येतो." एवढेच नाही, तर "आरक्षणानेच आमच्या वेदना कमी होतील. गोड बोलू आणि वेळ मारून नाही. त्याचे दुष्परिणाम वेगळे होतील. त्यामुळे खरे बोला. सरकार आले आणि खात्री पटली तर मंगळवारी दोन वाजता भूमिका स्पष्ट करणार," असेही जरांगे यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षणState Governmentराज्य सरकारEknath Shindeएकनाथ शिंदे