शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:38 IST

Devendra Fadnavis on Jayant Patil: राज्याच्या राजकारणात कायम जयंत पाटील यांच्या पक्षातराच्या चर्चा सुरू असतात. प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर जयंत पाटील भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतच स्पष्ट उत्तर दिले. 

Devendra Fadnavis Latest News: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा विशिष्ट कालावधीनंतर डोकं वर काढते. आताही जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि या चर्चेला राजकीय वर्तुळात तोंड फुटले. राजकारणात सातत्याने होणाऱ्या या चर्चांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त करत स्पष्ट भूमिका मांडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी 'हिंदी सक्ती हवीच कशाला' अशी लेख संग्रह पुस्तिका भेट दिली. याच मुद्द्यावर बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काल मला हिंदी सक्ती हवीच कशाला, असा मला वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह प्राप्त झाला. यात काही कात्रणे लावण्याची आवश्यकता आहे. त्या कात्रणांमध्ये शासनाच्या समितीने जो अहवाल दिला होता आणि समितीने पहिली ते १२वी पर्यंत हिंदी सक्ती करण्याची शिफारस केली होती."

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंकडे कोणती मागणी केली?

"तो अहवाल उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळासमोर आला. भाषेच्या उपसमितीमध्ये फक्त तज्ज्ञ नव्हते, तर शिवसेनेचे उपनेते होते, त्यांनीही शिफारस केली होती की,  पहिली ते १२वी हिंदी सक्ती करावी. तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला. फक्त स्वीकारलाच नाही, तर आठवड्यानंतर मिनिट्सला मंजूरी दिली. सरकारने स्वीकारल्यानंतर त्याचा शासनादेश असतो. त्यावर माझा आक्षेप नाहीये. फक्त त्यात ठाकरे सरकारला अहवाल सुपूर्द करतानाची बातमी लावा. तो स्वीकारल्याच्या बातम्या लावाव्या. मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर केलेली अधिकृत पोस्टचे कात्रण त्यात लावावे, अशी माझी माफक मागणी आहे", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

याच मुद्द्यावर बोलत असताना विरोधकांकडून टिप्पणी केली गेली. त्यावर देवेंद्र फडणवीस जयंत पाटलांना म्हणाले, "हो. आपल्या पुढची भेट घ्यावीच लागेल, नाहीतर यांना (माध्यमांना) खाद्य कसं मिळेल?"

जयंत पाटील भाजपमध्ये जाणार?

"हे एक कठीणच झाले आहे. जयंतराव, तुम्ही माझ्याकडे येऊन गेले की तुम्ही भाजपमध्ये येणार. हे आमच्याकडे येऊन गेले की, हे भाजपसोबत येणार. आपण संवादाच्या गोष्टी करतो आणि आता... मी माध्यमांना दोष देत नाही; पण माझी त्यांना विनंती आहे की, संवाद राहू द्या. कुणी कुणाला भेटले म्हणजे तो त्याच्या पक्षातच चाललाय, त्याची युतीच होतेय, असं नाही", असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पक्षातराच्या चर्चांना उत्तर दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा