WHO म्हणते हे वर्ष जगभरातील नर्सेसला समर्पित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 08:54 PM2020-04-06T20:54:20+5:302020-04-06T20:58:29+5:30

जागतिक आराेग्य संघटनेकडून 2020 हे वर्ष नर्सेस, आया यांना समर्पित करण्यात आले आहे.

WHO says this year is dedicated to nurses around the world rsg | WHO म्हणते हे वर्ष जगभरातील नर्सेसला समर्पित

WHO म्हणते हे वर्ष जगभरातील नर्सेसला समर्पित

Next

राहुल गायकवाड 
पुणे : काेराेनाचा उद्रेक जगभरातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये झाला आहे. त्याला राेखण्यासाठी सर्वच देशांकडून शर्थिचे प्रयत्न करण्यात येत आहेत. जगभरातील डाॅक्टर या काेराेनाच्या विषाणूशी लढा देत आहेत. या डाॅक्टरांच्याच खांद्याला खांदा लावून परिचारिका, वाॅर्डबाॅय, आया देखील काम करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आता जागतिक आराेग्य संघटनेकडून 2020 हे वर्ष परिचारिका तसेच आयांसाठी समर्पित केले आहे. या काळात जगभरातील सर्वच देशांनी त्यांच्यासाठी भरीव तरतूद करण्याचे आवाहन देखील आराेग्य संघटनेकडून करण्यात आले आहे. 

जगभरातील नर्सेस आणि आया रुग्णांच्या सेवेत नेहमीच कटीबद्ध असतात. रुग्णांची सर्व सुश्रुषा त्या करत असतात. तसेच नर्सेस, आया आणि वाॅडबाॅय हे आराेग्य क्षेत्राचा पाठीचा कणा आहेत. त्यामुळे आता जागतिक आराेग्य संघटनेकडून देखील त्यांच्या कामाची दखल घेऊन हे वर्ष त्यांना समर्पित केले आहे. जागतिक आराेग्य संघटना म्हणते, आराेग्य क्षेत्रात नर्सेस, आया आणि वाॅडबाॅय हे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ही लाेकं त्यांचे संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेत तसेच नवजात माता आणि बालकांच्या सेेवेत घालवतात. त्याचबराेबर रुग्णांना वेळेवर औषधे, लसी देणं, त्यांना वैद्यकीय सल्ले देणं त्याचबराेबर ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष देणे त्यांच्या आराेग्याची काळजी घेणं अशी कामे ते करत असतात. समाजातील रुग्णांची सेवा करण्यात ते नेहमीच अग्रभागी असतात. जगभरातील नागरिकांचे आराेग्य आबादीत ठेवण्यासाठी आणखी 9 दक्षलक्ष नर्सेस आणि आयांची गरज आहे. त्यामुळेच जागतिक आराेग्य संघटनेकडून 2020 हे वर्षे नर्सेस आणि आया यांना समर्पित करण्यात येत आहे. 

नर्सेस, आया आराेग्य क्षेत्राचा पाठीचा कणा 
नर्सेस आणि आया ह्या प्रत्येक आराेग्य क्षेत्राचा पाठीचा कणा आहेत. त्यामुळे आम्ही या वर्षी जगभरातील सर्वच देशांना आवाहन करत आहाेत की नर्सेस आणि आयांची आराेग्याबाबतची कटीबद्धता पाहता त्यांच्यासाठी तरदूर करावी 
- डाॅ. टेडराॅस अधॅनाेम घेब्रॅसस, जागतिक आराेग्य संघटनेचे डिरेक्टर जनरल 

सर्वसामान्यही या उपक्रमात हाेऊ शकतात सहभागी 
-  नर्सेस, वाॅडबाॅय, आया यांचा जाहीर सत्कार करता येऊ शकताे. 
-  एखादा साेहळा आयाेजित करुन त्यांना त्याला निमंत्रित करता येऊ शकते. 
-  विविध सार्वजनिक ठिकाणी या कॅम्पेन बाबतचे पाेस्टर लावू शकता.
-  सेलेब्रिटी, लीटर यांना सांगून त्यांच्या भाषणांमध्ये, कार्यक्रमांमध्ये या उपक्रमाबाबत उल्लेख करायला सांगू शकता.

Web Title: WHO says this year is dedicated to nurses around the world rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.