शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस-ठाकरे भेटीमागचं 'राज' काय?; टीकेनंतरही संवाद, शिंदे-उद्धव यांना सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 05:59 IST

केवळ शिंदेंना सोबत घेऊन मुंबईत उद्धव ठाकरेंचा पराभव करता येणार नाही हे लक्षात आल्याने भाजपने राज ठाकरे यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सोमवारी सकाळी ९ वाजता पोहोचून त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये काही मिनिटे गुप्तगु झाले. चर्चेचा तपशील कळू शकला नाही; पण यानिमित्ताने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही फडणवीस यांनी सूचक इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांचा मुंबईतील सहा जागांवर फटका बसला होता. माहीम मतदारसंघात शिंदेसेनेचे सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेला. कारण, राज ठाकरे यांचे पुत्र अमित हे रिंगणात होते. सरवणकर रिंगणात कायम राहिले आणि दोघेही पराभूत होऊन उद्धवसेनेला यश मिळाले होते. तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि राज यांच्यात फारसे सख्य नसल्याचे बोलले जात होते. सूत्रांनी सांगितले, केवळ शिंदेंना सोबत घेऊन मुंबईत उद्धव ठाकरेंचा पराभव करता येणार नाही हे लक्षात आल्याने भाजपने राज ठाकरे यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे.

३ मुद्द्यांत जाणून घ्या भेटीचे राज...

  • राज यांनी अलीकडेच मनसेच्या मेळाव्यात भाजपवर टीका केली होती. विधानसभा निकालाच्या आकडेवारीवरून त्यांनी शंका उपस्थित केल्या. असे असतानाही राज सोबत येऊ शकतात हे या भेटीनिमित्त सूचित करून फडणवीस एकाचवेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना अस्वस्थ करत असल्याचे मानले जाते.
  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीसोबत मनसेचे इंजिन जोडले गेले तर उद्धव ठाकरेंना मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मोठा धक्का बसू शकतो, असे जाणकार सांगतात.
  • राज यांचे पुत्र अमित यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेवर घेतले जाणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

 

आजची भेट राजकीय नव्हती. फडणवीस व राज ठाकरे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्या जिव्हाळ्यातून झालेली भेट आहे. राजकीय अर्थ कोणी काढू नये. - संदीप देशपांडे, मनसे नेते

राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे उघडला आहे. तिथे लोक चहापानाला येत असतात. हा कॅफे सगळ्यांसाठी खुला आहे. लोकांना चांगला नजारा पाहायला मिळतो.- संजय राऊत, उद्धवसेनेचे नेते, खासदार 

आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ही वैयक्तिक भेट होती. युती वगैरेचा काहीही विषय नव्हता. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज यांनी मला अभिनंदनाचा फोन केला होता, तेव्हा मी त्यांना घरी येईन, असे म्हटले होते. त्यानुसार मी आज गेलो, नाश्ता केला, गप्पा झाल्या एवढेच. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

वैयक्तिक मैत्रीतून झालेली ही भेट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अजून वेळ आहे, त्याची चर्चा आतापासून कोणीही करणार नाही. - सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे