शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही महाविकास आघाडीत जाण्याचा प्रयत्न केला, पण...', असदुद्दीन ओवेसी स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 19:05 IST

'माझ्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो.'

Asaduddin Owaisi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच नेते आपल्या उमेदवारांसाठी आपली पूर्ण ताकद लावत आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसीही आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात दौरे करत आहेत. यादरम्यान त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाण्याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली.

महाविकास आघाडीत जागा का मिळाली नाही?'मुस्लिमांना राजकीय नेतृत्व नाही, बार्गेनिंग पॉवर नाही, त्यामुळे त्यांचे राजकीय सक्षमीकरणही कमी झाले आहे. मुस्लिमांना राजकीयदृष्ट्या अस्पृश्य बनवले आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी भाजप आणि शिंदे सेनेच्या विरोधात मतदान केले होते. विधानसभेतील लोकांची मतदान पद्धत वेगळी असेल. इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहिले होते की, आम्हालाही महायुती सरकारला रोखायचे आहे, त्यामुळे आम्ही मविआत येऊ शकतो. आम्ही आमच्या बाजूने मविआत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.'

ओवेसींना सोबत घेतल्याने हिंदू मतदार नाराज होतील, अशी महाविकास आघाडीला भीती आहे का?या प्रश्नाला उत्तर देताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, 'माझ्या पक्षाने हरियाणाची निवडणूक लढवली नाही. मग तिथे भाजप कसा जिंकला? मविआवाले आम्हाला भाजपची बी टीम म्हणतात. पण, तुम्हाला तुमच्या आघाडीत आम्हाला सामील करायचे नसेल, तर माझा एक राजकीय पक्ष आहे. माझे दोन आमदार आहेत, अनेक ठिकाणी नगरसेवक आणि पंचायत सदस्य आहेत. त्यामुळेच मला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि मी लढवेल.'

देवेंद्र फडणवीसांवर टीकादेवेंद्र फडणवीसांनी त्यांना रझाकारांचे प्रतिनिधी म्हटल्यावर ओवेसी म्हणाले, 'भाजप शिवीगाळ आणि खोटे आरोप करणारा पक्ष आहे. एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेले विद्यमान उपमुख्यमंत्री बैचेन आहेत. मुख्यमंत्री होण्याच्या आपल्या स्वप्नांचा चुराडा झाल्याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे. त्यामुळे असंसदीय शब्द वापरून ते इतक्या खालच्या पातळीवर गेले आहेत,' अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा