शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:16 IST

अदानींची टॉवर्स शेलू आणि वांगणीला जाऊद्या आमचे काही म्हणणे नाही. देवणार डंपिंग ग्राऊंडवर अदानींनी टॉवर्स बांधावीत आमचे काही म्हणणे नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले...

आमच्यावर नेहमीच आरोप केला जातो की, शिवसेनेने मराठी माणसाकरिता काय केले? माझे सरकार जर यांनी पाडले गेले नसते, तर सहाजिकच आहे की, मी या सर्व गिरणी कामगारांना, सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांनाही घरे द्यायला सुरुवात केलीच होती. पण मुख्यतः गिरणी कामगारांना आणि पोलिसांनाही मुंबईत घरे दिली असती. पोलिसांना तर मिळत आहेतच. पण आणखीही दिली असती, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते  मुंबईत, आझाद मैदानावर सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षक आणि गिरणीकामगारांच्या आंदोलनाच्या मुद्द्यांवर पत्रकारासोबत बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, "आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षक आणि गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला घरे द्या, अशी मागणी करणारे गिरणीकामगार या दोघांचेही आंदोलन सुरू आहे. मला एका गोष्टीचे वैशम्य वाटले, "महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अधिवेशन इकडे सुरू आहे. लोकप्रतिनिधी इकजे आले आहेत. मात्र लोक वर्षानुवर्षे त्यांच्या व्यथा मांडत आहेत, ते मात्र आजाद मैदानात आंदोलन करत आहेत. 

ठाकरे पुढे म्हणाले, "शिक्षकांनाही आम्ही आश्वासन दिले आहे की, आम्ही तुमच्या लढ्यात तुमच्या सोबत आहोत. गिरणी कामगारांचा तर प्रश्नच नाही. कारम गिरणी कामगारांचा संप तांत्रिकदृष्ट्या बघितलं, तर अजूनही सुरूच आहे. त्यावेळी गिरणी कामगारांच्या तोंडाला पाणे पुसण्यात आली. वन थर्ड, वन थर्ड, वन थर्ड हा जो काही प्रकार केला गेला, यामुले गिरणी कामगारांची घरे तर गेलीच. गिरण्यांच्या जमिनीही गेल्या. गिरण्यांच्या जागांवर टॉवर्स आणि मॉल्स उभे राहिले आणि ज्या गिरणी कामगारांनी रक्त सांडून घाम गाळून ही मुंबई उभी केली, नव्हे संयुक्तमहाराष्ट्राच्या लढ्यात आंदोलन करून मिळवून दिली. तो गिरणी कामगार आज स्वतःच्याच मुंबईत बेघर झाला आहे."

"आज आमची हीच मागणी आहे की, एकीकडे गिरणी कामगार मुंबई बाहेर फेकला जातो. त्यांना शेलू-वांगडीला पाठवले जाते आणि दुसरीकडे आदानीला धारावीची जमीन दिली जात आहे. आमची आग्रहाची मागणी आहे की, गिरणी कामगारांना धारावीत घरे द्या आणि आदानीची टॉवर्स शेलू-वांगडीला उभी करा. आदानीने देवनार डंपिंग ग्राउंडवर टॉवर्स बांधावेत किंवा त्यांना मिळालेला टी.डी.आर. शेलू-वांगडीला वापरावा. मात्र, ज्यांनी मुंबई मिळवून दिली, त्या गिरणी कामगारांना तेथे पाठवण्याऐवजी, त्यांना धारावीत घरे द्या. आदानीला कुर्ला मदर डेरीची जमीन दिली आहे, तिथे गिरणी कामगारांना घरे द्या. आणि अदानींची टॉवर्स शेलू आणि वांगणीला जाऊद्या आमचे काही म्हणणे नाही. देवणार डंपिंग ग्राऊंडवर अदानींनी टॉवर्स बांधावीत आमचे काही म्हणणे नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना