शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नावर पवार-विखे एकत्र!

By admin | Updated: February 2, 2015 04:42 IST

राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणा-या शरद पवार व राधाकृष्ण विखे यांनी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळवण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात एकत्रित लढा देण्याचा निर्धार शिर्डीत व्यक्त केला़

शिर्डी : राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणा-या शरद पवार व राधाकृष्ण विखे यांनी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळवण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात एकत्रित लढा देण्याचा निर्धार शिर्डीत व्यक्त केला़दमणगंगा व नारपार खोऱ्यातील पाणी गुजरातकडे वळवण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात बैठक घेऊन राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही उभयतांनी घेतला़ डाळिंब उत्पादकांच्या परिषदेसाठी आलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात येथे चर्चा झाली. पवारांनी जिल्ह्यातील शेती व पाणीप्रश्नाची माहिती घेतली़ गुजरातला पाणी पळवण्याबाबतची माहिती अतिशय गांभीर्याने जाणून घेतली. प्रवरा सामाजिक अभ्यास मंडळ व महाराष्ट्र पाणी परिषदेने याचा सविस्तर अभ्यास केल्याची माहिती विखे यांनी दिली़ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, आ. वैभव पिचड आदी चर्चेत सहभागी झाले होते.दमण खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रापैकी ६२ व नारपार खोऱ्यातील ५२ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे़ हे पाणी गुजरातला वळवण्यापूर्वी महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गोदावरी व तापी या तुटीच्या खोऱ्यात वळवावे लागेल़ मात्र राज्य शासनाने याबाबत एकतर्फी निर्णय करण्याची भूमिका घेतली आहे़ पाणी कराराच्या संदर्भातील मसुदा शासनाने जाहीर करावा, ही मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे विखे यांनी पवारांना सांगितले. एकत्रित बैठक घेऊन राज्य व केंद्र शासनाशी बोलू, असे आश्वासन पवार यांनी दिले़दारणा, भंडारदरा धरणांबरोबरच विखे यांनी पवारांना त्याचा न्यायालयीन लढा, जलसंपदा नियमन प्राधिकरणाने सुरू केलेले दावे, पेरू, डाळिंब उत्पादकांच्या समस्या, उसाचे कमी झालेले क्षेत्र आदींवर चर्चा केली़ (प्रतिनिधी)