शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
6
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
9
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
10
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
13
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
16
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
17
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
18
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
19
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
20
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गावांना जिल्हाबाह्य मूल्यमापनाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 18, 2014 01:02 IST

लोकसभा निवडणुकीनंतरही तंटामुक्त गाव मोहीम राबविणार्‍या गावांची मूल्यमापनाची प्रतीक्षा कायम आहे.

संतोष मुंढे/ वाशिम

लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे अंमलबजावणीला ह्यब्रेकह्ण लागलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने निवडणूकीनंतरही गती पकडलेली नाही. आर्थिक वर्षात २0१३-१४ मध्ये सदर मोहीम राबविणार्‍या गावांची जिल्हाबाह्य मूल्यमापनाची, तर २0१२-१३ मधील गावांची अंतिम निकालाची प्रतीक्षा कायम आहे.
गावातील तंटे गावातच मिटविण्याचा महत्वाकांक्षी दृष्टिकोन ठेवून राज्य शासनाने २00७ पासून राज्यभरात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरु केली. या मोहिमेत ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी, उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या गावांना लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारित लाखो रुपयांचे पुरस्कार देण्याचे धोरण अंगीकारले. सोबतच या मोहिमेचा प्रचार व प्रसार व्यापक प्रमाणात होण्यासाठी, राज्यभरातील पत्रकांरासाठी पुरस्कार योजनाही सुरू करण्यात आली.
सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे २0१३-१४ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला ह्यब्रेकह्ण लागला होता. दरवर्षीच्या नियोजनानुसार, तंटामुक्तीच्या कार्याचे मूल्यमापन करणार्‍या समित्या १५ एप्रिलपूर्वी गठीत होणे आवश्यक असताना, त्या मे महिन्यात गठित कराव्या लागल्या. प्रशिक्षण व मूल्यमापनाची ३0 एप्रीलपूर्वी करावी लागणारी कारवाई २२ मे नंतर करावी लागली. स्वाभाविकरित्या मूल्यमापनाच्या कामासाठी ५ जून ते ५ जूलैपर्यंंतचा कालावधी शासनाला निश्‍चीत करावा लागला. शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत समित्यांचे गठन व स्वयंमूल्यमापनानंतरची जिल्हांतर्गत मुल्यमापनाची प्रक्रिया राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्याने पार पाडली; परंतू शासनाने राज्यभरातील कोणत्या जिल्ह्याची समिती कोणत्या जिल्ह्याचे जिल्हाबाह्य मूल्यमापन करेल, याचा निर्णयच आजतागायत न घेतल्याने आधी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेल्या तंटांमुक्त ग्राम मोहिमेत सहभागी गावांना यासंबंधी शासन निर्णयाची अद्यापही प्रतीक्षा आहे. शासनाने आणखी विलंब लावला व तोंडावर येऊन ठेपलेया विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, तर राज्यभरातील हजारो गावांच्या हिताच्या या मोहिमेला मोठे ग्रहण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.