शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 03:14 IST

११ दिवसात महायुती सरकारने १६०० निर्णय घेतले. त्यातील अनेक मी रद्द करणार. बिल्डरांचे, विकासकांचे खिसे भरणारे निर्णय रद्द करणार, अधिकाऱ्यांना मी सांगतो, त्यांना अन् तुम्हालाही जेलमध्ये टाकू.

मुंबई : मी जिवंत असेपर्यंत महाराष्ट्र मोदी-शाह-अदानींचा होऊ देणार नाही. तसेच राज्यातील महायुती सरकारने शेवटच्या दिवसात जनतेच्या मुळावर येणारे जे निर्णय घेतले ते आमचे सरकार येताच रद्द केले जातील, दोन महिने थांबा कोणालाही सोडणार नाही, असा इशारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शिवाजी पार्कवरील पक्षाच्या दसरा मेळाव्यात दिला. 

११ दिवसात महायुती सरकारने १६०० निर्णय घेतले. त्यातील अनेक मी रद्द करणार. बिल्डरांचे, विकासकांचे खिसे भरणारे निर्णय रद्द करणार, अधिकाऱ्यांना मी सांगतो, त्यांना अन् तुम्हालाही जेलमध्ये टाकू. मुंबई महापालिकेच्या तीन लाख कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. कंत्राटदारांच्या घश्यात पैसा टाकला जात आहे, त्यांची यादी घेऊन सत्ता येताच जेलमध्ये टाकू. सिमेंट रस्त्यांमध्ये खडी टाकणारे कोण याची चौकशी करणार. गावठाणांमधील अकृषक कर रद्द करण्याचा सरकारचा निर्णय शिंदेंनी मित्रांसाठी घेतला, दोन महिने थांबा, आमचे सरकार येऊ द्या, असे सगळे निर्णय रद्द करू असे ते म्हणाले. 

यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे पहिल्यांदाच भाषण झाले. रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे व्यासपीठासमोर बसले होते. 

शिंदेच्या एन्काऊन्टरचे समर्थनबदलापूरमधील शिंदे एन्काऊन्टरचे उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले. अशा नराधामाला गोळ्या घातल्याच पाहिजे. आनंद दिघे असते तर त्यांनी तेच केले असते पण या एन्काऊन्टरच्या आड पुरावे नष्ट करून कोणाला पाठीशी घातले जात असेल तर त्याचाही उलगडा झाला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

सरकार येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांची मंदिरे-आपले सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यात येतील असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. जे शिवरायंच्या मंदिरांना विरोध करतील त्यांना महाराष्ट्र बघून घेईल. -शिवरायांची मंदिरे बांधायची नाहीत तर मोदींची बांधायची का? जय श्रीरामपेक्षाही मोठ्याने आम्ही ‘जय शिवराय’ म्हणणार. महायुती सरकारने शिवरायांच्या पुतळ्यात पैसे खाल्ले, तरीही त्यांना शिवराय मत मिळवायचे यंत्र वाटते, अशी टीका त्यांनी केली. -आपले सरकार येताच धारावी पुनर्विकासाचे टेंडर रद्द करू असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना