शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

"एकनाथ शिंदेंची गरज संपली, त्यांना संपवून नवा 'उदय' पुढे येणार"; वडेट्टीवारांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:10 IST

महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची गरज संपली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar on Eknath Shinde: महायुती सरकारमध्ये सध्या पालकमंत्री पदावरूनही प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी महायुती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी दोन पालकमंत्र्यांच्या नियु्क्तीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरुन वादाची ठिणगी पडल्याचे म्हटलं जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन दरे गावी गेल्याचे म्हटलं जात आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांची गरज संपली असून नवीन उदय पुढे येणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्री पदावर शिंदे गटाने दावा केला होता. तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीष महाजन यांच्या नावाला अजित पवार गटाने विरोध केला होता. त्यानंतर रविवारी महायुती सरकारमधील मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली. दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावरुनच विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे.

"ही सगळी परिस्थिती पाहून जनताच सरकारला स्थिगिती देईल असं मला वाटायला लागलय. बहुमत मिळालं तरी ही काय सरकार चालवायची पद्धत आहे. आपआपसातले मतभेद वाढले आहेत. केवळ सत्तेसाठी ही स्पर्धा सुरु आहे. भांडा आणि महाराष्ट्राचे वाटोळे करा असं म्हणायची वेळ आली आहे. आता पालकमंत्री बदलले आहेत शेवटी मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदे नाराज होऊन दरे गावी गेल्याचे पत्रकारांनी विचारले. त्यावरही वडेट्टीवारांनी भाष्य केलं. "नाराज होऊन पदरात पाडता येईल असा विषय आता फक्त बाकी आहे. एकनाथ शिंदेची परिस्थिती बिकट आहे. एकनाथ शिंदेंची गरज संपली का? कदाचित एकनाथ शिदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल. शिवसेनेच्या बाबतीत ही सुद्धा स्थिती येईल. शिवसेनेचा तिसरा उदय दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण उदय दोन्ही बाजूवर हात ठेवून आहेत. त्यांनी संबंध इतके सुंदर करुन ठेवले आहेत की ते उदयासाठीच आहेत," असा टोलाही विजय वडेट्टीवारांनी लगावला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUday Samantउदय सामंत