शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : कोल्हापूरमध्ये उडाली भातकापणीची धांदल

By admin | Updated: October 20, 2016 13:26 IST

सध्या ग्रामीण भागात खरीप काढणीची एकच धांदल उडाली आहे

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २० -  सध्या ग्रामीण भागात खरीप काढणीची एकच धांदल उडाली आहे. परतीच्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने बळिराजाची धावपळ उडाली असून शिवारं माणसांनी अक्षरश: फुलली आहेत. भात, भुईमुगाची चांगली वाढ झाली असून पिकांना चांगला उतारा मिळत असून, भाताचे गुंठ्याला दीड पोत्याचे उत्पादन होत आहे. 
गेल्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पिके करपून गेली होती. खरीप पिकांना झटका बसल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर पुरेशा पावसाअभावी रब्बीचा हंगामही वाया गेला. जानेवारीनंतर तर पाणीकपातीने शेतकरी कासावीस झाला आणि अशा परिस्थितीत त्याने खरिपाची पेरणी केली. पण जूनपासूनच मान्सूनने दमदार हजेरी लावली. जून ते आॅगस्टपर्यंत एकसारखा पाऊस राहिल्याने भात, भुईमूग पिकांची वाढ जोमात झाली. भाताला पोषक असाच पाऊस राहिल्याने किडीचा प्रादुर्भाव अजिबात झाला नसल्याने पिकांची जोमदार वाढ झाली. 
गेल्या आठ-दहा दिवसांपासून भात, भुईमूग, सोयाबीन काढणीस सुरुवात झाली आहे. दसºयात परतीच्या पावसाने रोज हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने काढणीत अडथळा निर्माण झाला होता. गेले काही दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने भातकापणीची एकच धांदल उडाली आहे. दिवाळी तोंडावर असल्याने तत्पूर्वी भातकापणी पूर्ण करण्यासाठी शेतक-यांनी गडबड सुरू आहे. पोषक वातावरण राहिल्याने भाताचे उत्पादन चांगले मिळत आहे. शेतकºयाच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘माती मळल्यासारखे भात मळले जात आहे.’ भाताचा गुंठ्याला दीड  पोत्याचा उतारा मिळत आहे.  गेल्यावर्षीच्या दुष्काळाची भरपाई यावर्षी निघेल असे शेतक-यांचे मत आहे.