शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीच्या विस्तारात १४ हेक्टर खारफुटीचा बळी

By admin | Updated: February 12, 2015 05:41 IST

एनपीटीच्या विस्तारांतर्गत तिसऱ्या टर्मिनलच्या वाढीव ३३० मीटर लांबीच्या टर्मिनलसाठी १४ हेक्टर खारफुटीचा बळी देण्यास राज्याच्या वन खात्याने मान्यता

नारायण जाधव, ठाणेजेएनपीटीच्या विस्तारांतर्गत तिसऱ्या टर्मिनलच्या वाढीव ३३० मीटर लांबीच्या टर्मिनलसाठी १४ हेक्टर खारफुटीचा बळी देण्यास राज्याच्या वन खात्याने मान्यता दिली आहे़ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी यापूर्वी परिसरातील ६१५ हेक्टर खारफुटीचा बळी देण्यात आला आहे़ यात ६० हेक्टर खाडीचा समावेश आहे़ त्यापाठोपाठ आता १४ हेक्टर खारफुटीची जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे़ या निर्णयामुळे परिसरातील फ्लेमिंगोंंच्या अस्तित्वासह सागरी पर्यावरणावरही गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे़ मुंबई बंदराला पर्याय म्हणून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात न्हावा-शेवा गावाच्या हद्दीत जवाहरलाल नेहरू बंदर बांधण्यात आले़ तेथील वाढती वाहतूक पाहता तिसऱ्या टर्मिनलचा ३३० मीटर लांबीपर्यंत विस्तार करण्यात येत आहे़ याला मच्छीमारांसह पर्यावरणवाद्यांचा विरोध असताना आता केंद्र सरकारच्या मान्यतेने राज्याच्या वन खात्याने येथील १४ हेक्टर खारफुटीची जमीन दिली आहे़ जेएनपीटीच्या संकल्पित क्षमतेपेक्षा जास्त ताण पडत असल्याने विस्तार करणे आवश्यक झाले आहे़ हा विस्तार राज्याच्या हिताचा असल्याने जेएनपीटीच्या मागणीनुसार केंद्राच्या परवानगीने ही १४ हेक्टर खारफुटीची जमीन वळती करण्यास मान्यता दिल्याचे याबाबतच्या आदेशात वन विभागाने म्हटले आहे़ जेएनपीटी आणि नियोजित विमानतळामुळे येथील मासेमारीसह सागरी पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे़ नवी मुंबई विमानतळासाठी वाघिवली येथील २६५ हेक्टर आणि कामोठे येथील ३१० हेक्टर खारफुटी आणि ६० हेक्टर क्षेत्राच्या खाडीचा बळी देण्यास वन विभागाने मान्यता दिली आहे़