शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे हाच न्याय ठरला असता, आता एकनाथ शिंदे...; उल्हास बापट यांचे सर्वोच्च सुनावणीवर धक्कादायक वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:00 IST

Ulhas Bapat on Shiv Sena Supreme Court Hearing: घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी शिवसेना सत्तासंघर्षावर मोठे विधान केले आहे. सर्वोच्च न्यायालय आणि सभापतींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी शिंदे सरकारला बेकायदेशीर ठरवले आहे.

पुणे: "महाराष्ट्रातील तत्कालीन शिंदे सरकार हे पहिल्या दिवसापासून बेकायदेशीर आहे. पक्षांतर कसे करावे याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहे," अशा परखड शब्दांत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपली भूमिका मांडली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रलंबित सुनावणीवर भाष्य करताना त्यांनी लोकशाही संस्थांच्या घसरत्या विश्वासाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना बापट म्हणाले की, "लोकशाहीमध्ये ज्या संस्थांवर विश्वास असायला हवा, तो आता कमी होत चालला आहे. १५ वर्षांपूर्वी मी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल हे खात्रीने सांगू शकत होतो, मात्र आता तो विश्वास उरलेला नाही. भारताची लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सर्वोच्च न्यायालयाचे आहे, मात्र ३-३ वर्षे निर्णय लागत नसल्याने सामान्य जनतेत संभ्रमाचे वातावरण आहे."

सभापती 'अंपायर' नाहीत, तर पक्षाचे सदस्य
विधानसभा सभापतींच्या भूमिकेवर टीका करताना बापट यांनी नमूद केले की, राज्यघटनेनुसार सभापतींनी 'अंपायर' म्हणून काम करणे अपेक्षित आहे. मात्र, आपल्याकडे सभापती एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्य असल्यासारखे वागतात. राहुल नार्वेकर यांनी ३ महिन्यात निर्णय घेणे आवश्यक होते, मात्र ६ महिने उलटूनही कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बापट यांनी मांडलेले ५ महत्त्वाचे मुद्दे:

  • उद्धव ठाकरेंना न्याय: वास्तविक पाहता उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नेमणे हाच योग्य घटनात्मक न्याय ठरला असता.
  • आयोगाचा अधिकार: पक्षचिन्ह कोणाला द्यायचे याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, मात्र त्यांनी बहुमत आणि पक्षाची घटना या दोन गोष्टींचा विचार करणे अनिवार्य होते.
  • शिंदेंची अपात्रता: एकनाथ शिंदे यांची मुदत आता संपली आहे, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते आता अपात्र ठरत नाहीत, हा मोठा पेच आहे.
  • न्यायालयीन बदल: सर्वोच्च न्यायालय स्वतःचा जुना निर्णय बदलू शकते, त्यामुळे येणारा निकाल हा पुढील काळासाठी नवा कायदा ठरेल.
  • राजकीय उलथापालथ: जर निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला, तर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल, पण त्याचा सध्याच्या सरकारवर तात्काळ परिणाम होईलच असे सांगता येणार नाही.
English
हिंदी सारांश
Web Title : Reinstating Thackeray as CM would have been justice: Ulhas Bapat.

Web Summary : Constitutional expert Ulhas Bapat criticizes the Shinde government's legality and declining trust in democratic institutions. He argues Thackeray should have been reinstated. Bapat highlights concerns about the speaker's impartiality, potential disqualification issues, and the Supreme Court's pivotal role in shaping future laws.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र