विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 07:33 IST2026-05-18T07:03:07+5:302026-05-18T07:33:57+5:30

काही सदस्यांनी ९० टक्क्यांहून अधिक उपस्थिती राखत आदर्श कामगिरी केली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार विधान परिषदेतील कामकाजात सदस्यांमध्ये मोठी तफावत दिसून येते.

Uddhav Thackeray's attendance in the Legislative Council was only 31.58%; Members' attendance figures revealed | विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर

विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या चार वर्षांत केवळ ३१.५८ टक्के उपस्थिती नोंदवली, तर काही सदस्यांनी सलग तीन अधिवेशनांमध्ये एकदाही हजेरी लावलेली नाही. उलट, काही सदस्यांनी ९० टक्क्यांहून अधिक उपस्थिती राखत आदर्श कामगिरी केली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार विधान परिषदेतील कामकाजात सदस्यांमध्ये मोठी तफावत दिसून येते.

उद्धव ठाकरे यांची उपस्थिती किती?
२०२० मध्ये विधान परिषदेत प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरे यांनी एकूण १३३ बैठकींपैकी केवळ ४२ बैठकींना हजेरी लावली. म्हणजेच त्यांची उपस्थिती केवळ ३१.५८ टक्के इतकी राहिली.
उद्धव ठाकरे २०१९ मध्ये मुख्यमंत्री झाले होते. या काळातील उपस्थितीची नोंद उपलब्ध नाही. मात्र २०२२ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पावसाळी अधिवेशनात फक्त एकदाच उपस्थिती लावली. २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही १६ पैकी केवळ ४ बैठकींना ते उपस्थित होते.३ अधिवेशनांना पूर्ण दांडी
उपलब्ध आकडेवारीनुसार शिवसेनेच्या भावना गवळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सलग तीन अधिवेशनांमध्ये एकदाही उपस्थिती दर्शवली नाही.

यांची सर्वाधिक उपस्थिती
विशेष म्हणजे, अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांनी सहा वर्षांतील १८ पैकी १३ अधिवेशनांत १०० टक्के उपस्थिती नोंदवली. शशिकांत शिंदे यांनी १८ पैकी ११ अधिवेशनांत पूर्ण उपस्थिती राखली.
सध्याच्या सदस्यांमध्येही उल्लेखनीय कामगिरी
सध्याच्या सदस्यांमध्ये मनीषा कायंदे, जगन्नाथ अभ्यंकर आणि सुधाकर आडबाले यांनी अनेक अधिवेशनांत १०० टक्के उपस्थिती नोंदवत लक्ष वेधले आहे.

Web Title : विधान परिषद में ठाकरे की उपस्थिति केवल 31.58%; उपस्थिति डेटा सामने आया।

Web Summary : उद्धव ठाकरे की विधान परिषद में उपस्थिति केवल 31.58% थी। कुछ सदस्य लगातार तीन सत्रों में अनुपस्थित रहे। अमोल मिटकरी जैसे अन्य लोगों ने 100% उपस्थिति दर्ज की। वर्तमान सदस्य भी अलग-अलग उपस्थिति रिकॉर्ड दिखाते हैं।

Web Title : Thackeray's attendance in Legislative Council just 31.58%; attendance data revealed.

Web Summary : Uddhav Thackeray's Legislative Council attendance was only 31.58%. Some members missed three sessions straight. Others, like Amol Mitkari, achieved 100% attendance. Current members also show varied attendance records.