शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार, हवामान विभागाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 02:45 IST

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगरात चांगला पाऊस पडत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेला दाखल होणारा पाऊस मुंबईला झोडपून काढत आहे.

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने ‘पुनश्च हरिओम’ केले आहे. रविवारसह सोमवारी मुंबई शहर, उपनगरात तुरळक ठिकाणी विश्रांती घेत अन्य ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर आता मंगळवारसह बुधवारी मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. १४, १५ आणि १६ जुलै रोजी महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर सोसाट्याचा वारा वाहेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.- गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगरात चांगला पाऊस पडत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळेला दाखल होणारा पाऊस मुंबईला झोडपून काढत आहे.- सोमवारी सकाळी ११ वाजता तसेच दुपारी ४ वाजता मुंबईत तुरळक ठिकाणी मोठ्या सरी कोसळल्या. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत २०, तर मध्य मुंबईत ४० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात २० ते ४० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. नरिमन पॉइंट, भायखळा, वरळी, माहीम, कुर्ला, बीकेसी, बोरीवली, कांदिवली, पवईसह लगतच्या परिसराचा यात समावेश आहे.मेघगर्जनेसह विजा कडाडणार१४ जुलै : कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल.१५ जुलै : कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल.१६ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.१७ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र