शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उद्यान, तरण तलावांचे पाणी बंद

By admin | Updated: July 17, 2014 02:33 IST

अपु-या पावसामुळे तलावातील पातळी खालवत असल्याने पालिकेने २ जुलैपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली आहे़

मुंबई : कोणतेही पर्यायी जलस्त्रोत विकसित न करता पाणीकपात वाढविण्यावरच भर देणाऱ्या प्रशासनाला विरोधी पक्षाने धारेवर धरताच तरण तलाव, उद्यान, शीतपेय, बाटलीबंद पाणी पुरविणाऱ्या कंपन्या आणि बांधकामांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय पालिकेने आज घेतला़ त्याचबरोबर मॉल्स, पंचतारांकित हॉटेल्स, कारखाने अशा व्यापारी क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात उद्यापासून थेट ५० टक्के कपात होणार आहे़
अपुऱ्या पावसामुळे तलावातील पातळी खालवत असल्याने पालिकेने २ जुलैपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली आहे़ ही कपात आणखी दहा टक्क्यांनी वाढविण्यात येणार होती़ परंतु यावर विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेत व्यावसायिक ग्राहकांवर पालिका मेहेरबान का, असा जाब विचारला होता़ यामुळे अडचणीत आलेल्या प्रशासनाने तूर्तास पाणीकपात न वाढविता पाण्याचा अपव्यय टाळण्याकडे भर दिला आहे़
त्यानुसार मुंबईतील तरणत लावांचा पाणीपुरवठा उद्यापासून बंद करण्यात येणार आहे़ तसेच मॉल्स, तारांकित हॉटेल्स, कारखाने यांची २० टक्के पाणीकपात ५० टक्क्यांवर नेण्यात येणार आहे़ त्याचबरोबर शीतपेय आणि बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपन्या आणि बांधकामांच्या ठिकाणी केवळ तेथील कामगारांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे, तर उद्यान व शौचालयाचे पाणीही बंद करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)