शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

५०० जागा वाचविण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: June 22, 2014 01:00 IST

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात देशात एमबीबीएसच्या तीन हजार जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम वर्ष एमबीबीएसची प्रवेश क्षमता ५० व १०० असणाऱ्या

मेडिकल : पायाभूत सोयींसाठी वेळ मागणार नागपूर : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात देशात एमबीबीएसच्या तीन हजार जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम वर्ष एमबीबीएसची प्रवेश क्षमता ५० व १०० असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्येकी ५० वाढीव जागा मिळणार होत्या. महाराष्ट्रात २०६० जागांवरून २५६० जागांवर यावर्षी प्रवेश मिळणार होते. परंतु एमसीआयने ५०० जागा राखून ठेवल्याने जुन्याच जागांवर यावर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. १५ जुलैपूर्वी वाढलेल्या जागा मिळविण्यासाठी दोन खासदारांसोबतच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने आपल्या प्रयत्नाला वेग आणल्याची माहिती आहे. लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांचे प्रमाण वाढविण्यासाठी एमबीबीएसच्या जागेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील शासकीय कॉलेजांमध्ये ५०० जागा वाढणार होत्या. त्यादृष्टीने ५० व १०० जागा असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजांकडून तातडीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. सरकार पातळीवर असलेली दोन प्रमाणपत्रे आणि महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या संलग्नीकरणाच्या हमीपत्रासह हा प्रस्ताव एमसीआयकडे सादर करावयाचा होता. त्यानुसार नागपूर, सोलापूर, नांदेड, अकोला, लातूर, मीरज, कोल्हापूर, यवतमाळ, धुळे आणि अंबेजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर केले. त्यामुळे गतवर्षी राज्यातील या १० महाविद्यालयांना प्रत्येकी ५० अशा ५०० जागा वाढवून मिळाल्या. एमसीआयने महाविद्यालयांना त्रुटीची पूर्तता करण्याच्या अटीवर या वाढीव जागांना मान्यता देण्यात आली होती. या अटींना घेऊन मे महिन्यात एमसीआयच्या चमूने या दहाही महाविद्यालयांचे निरीक्षण केले. याचा अहवाल अद्यापही आला नसला तरी अनेक महाविद्यालयांमध्ये त्रुटीची पूर्तताच झाली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे जुन्याच २०६० जागांवरच प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्य सरकारच्या उदासीनतेवर टीका होत आहे. याशिवाय वर्षभरात त्रुटी पूर्ण करणेही शक्य नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकार या जागांवर १५ जुलैपर्यंत निर्णय घेणार आहे. त्यापूर्वी या जागा मिळविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, खा. नाना पटोले, खा. हंसराज अहिर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सचिव म्हैसकर आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी आपल्या प्रयत्नांना गती आणल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)