शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीनवेळा सिग्नल तोडल्यास लायसन्स रद्द

By admin | Updated: June 5, 2014 23:15 IST

एखाद्या वाहन चालकाने तीन वेळा वाहतूक नियम मोडला तर त्याचा वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल.

गडकरी यांची घोषणा : मोटार वाहन कायद्यात बदल करणारनबिन सिन्हा : नवी दिल्लीएखाद्या वाहन चालकाने तीन वेळा वाहतूक नियम मोडला तर त्याचा वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल. त्यानंतरही वाहन चालकाने पुन्हा वाहतुकीचे नियम तोडले तर मात्र त्याचा परवाना कायमचा रद्द केला जाईल. यासाठी येत्या महिनाभरात मोटार वाहन विधेयकाचा मसुदा नव्याने तयार करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ता परिवहन, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी जाहीर केले.केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्यात बदल करून वाहतूक नियम तोडणार्‍यांविरुद्ध कठोरपणे वागण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. गडकरी यांनी गुरुवारी ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आणि भारतासाठी आदर्श असा कायदा तयार करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स व सिंगापूरसह काही प्रमुख देशांमधील मोटार वाहन कायद्याचा अभ्यास करण्याची सूचना अधिकार्‍यांना दिली.यापुढे वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांना केवळ दंड आकारून सोडले जाणार नाही. तर तीनवेळा सिग्नल तोडणार्‍यांविरुद्ध आता कठोर कारवाई केली जाईल. आम्ही त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करू. त्यानंतरही त्याने सिग्नल तोडल्यास परवाना कायमचा रद्द केला जाईल, असे गडकरी म्हणाले.सध्याच्या रस्ता सुरक्षा नियम आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मध्ये बदल करण्याची आपली इच्छा आहे. रस्ता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व राज्ये व अन्य पक्षांची एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात येईल. यासोबतच रस्ता सुरक्षेवरील राष्ट्रीय जनजागृती कार्यक्रम लागू केला जाईल. तसेच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेची पुनर्रचना केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. सर्व राज्य सरकारांशी समन्वय साधून सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी एक रोडमॅप तयार करण्याची सूचना गडकरी यांनी आपले उपमंत्री कृष्णा पाल यांना केली आहे.हा मुद्दा युद्धपातळीवर हाती घेण्यात येईल आणि संसदेच्या पुढील अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडले जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाची रस्ता सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यासारख्या विकसित देशांमधील वाहतूक नियम व कायद्यांचा अभ्यास करण्यात येईल. वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांना सोडले जाणार नाही, असे गडकरी म्हणाले.भारतात दरवर्षी १.४ लाख लोक रस्ता अपघातात मृत्युमुखी पडतात आणि ५ लाखांवर लोक जखमी होतात, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. अपघातांना आळा घालण्यासाठी अपघातप्रवण विभागांची ओळख पटविण्याच्या दिशेने विस्तृत अभ्यास करण्याचे राष्ट्रीय माहमार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.