शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री बदलासाठी राष्ट्रवादीचा दबाव नाही

By admin | Updated: June 23, 2014 04:09 IST

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी असली तरी, मुख्यमंत्री बदल हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बदलासाठी राष्ट्रवादीचा कोणताही दबाव नाही

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी असली तरी, मुख्यमंत्री बदल हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बदलासाठी राष्ट्रवादीचा कोणताही दबाव नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष़्ट केली. लोकसभा निवडणुकीमध्ये पानीपत झाल्यानंतर महाराष्ट्रात नेतृत्वबदल करण्यासाठी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींवरील वाढता दबाव अणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षश्रेठींकडे व्यक्त केलेली कथित नाराजी या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून चव्हाण यांच्या बदलासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. याबाबत पवार यांना विचारले असता, ते म्हणाले की, हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. ज्यांच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र ठरलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांच्या वरिष्ठांना भेटले असतील तर ते त्यांचा निर्णय घेतील. तो त्यांचा अधिकार आहे. त्याबाबत बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. मुख्यमंत्र्याबाबत आमची कोणतीही तक्रार नाही ही केवळ चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने दबाव टाकण्याचे कारणच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.