शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बड्या नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला, राज्यभरात सभांचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 06:59 IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुद्द्यांची पेरणी, मग मतांचे पीक कोणाला मिळणार, विकासकामावरच भर

मुंबई : नगर परिषदेची निवडणूक कार्यकर्त्यांची, पण त्यानिमित्ताने राज्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नेत्यांनी सभांचा धडाका लावला असून विविध मुद्द्यांची पेरणी करत ते मतांचा जोगवा मागत आहेत. मतांचे पीक कोण घेणार हे ३ डिसेंबरला कळेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपापल्या पक्षाच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. 

उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष प्रचारात नाहीत. मात्र, त्यांच्या पक्षाचे काही नेते सभा घेत आहेत. त्यात अंबादास दानवे आदींचा समावेश आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही राज्यभर सभा घेत आहेत. काँग्रेस, भाजपचे अन्य बडे नेते आपापल्या जिल्ह्यांतील प्रचाराची धुरा सांभाळत असून आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये ते सहभाग घेत आहेत.

महायुती किंवा महाविकास आघाडी सर्वच जागांवर एकत्रित लढत असल्याचे चित्र नाही. कुठे एकत्र तर कुठे एकमेकांच्या विरोधात ते लढत आहेत. कोणावरही टीका न करता केवळ विकासाचा अजेंडा मांडण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस भाजपसाठी करत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत टोकाची टीका प्रचारामध्ये कमी दिसते.

बिघाडीचा फटका तिन्ही पक्षांना बसेल...

बऱ्याच नगर परिषदांमध्ये महायुतीतील बिघाडीचा फटका तिन्ही पक्षांना बसेल, असे मानले जात आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजप विरुद्ध शिंदेसेना असा कलगीतुरा रंगला असून त्याचे पडसाद राज्याच्या अन्य भागातही उमटण्याची शक्यता आहे.

शिंदेसेनेने अनेक ठिकाणी भाजपविरुद्ध, तर भाजपने शिंदे सेनाविरुद्ध मोर्चेबांधणी केल्याचेही चित्र आहे. या दोन पक्षांमध्ये ठिकठिकाणी आलेल्या कटुतेचे निकालानंतर काय होईल, महायुती सरकारवर त्याचा दुष्परिणाम होणार नाही ना, याचीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

महायुतीच्या सभांना लाडक्या बहिणींचा चांगला प्रतिसाद

विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती नगरपरिषदांमध्येही आपल्याला दिसेल. ट्रिपल इंजिन सरकारला मतदार पसंती देतील, असे भाजपचे नेते सांगत आहेत. इतर पक्षांच्या तुलनेत कार्यकर्त्यांची मजबूत फळी हे भाजपचे वैशिष्ट्य याही निवडणुकीत दिसत आहे.

फडणवीस, शिंदे आणि पवार हे महायुती 3 सरकारची उपलब्धी, केंद्र सरकारने लहान शहरांच्या विकासासाठी केलेली कामे आणि दिलेला निधी तसेच भविष्यातील योजना यावर प्रचारात फोकस करत आहेत. त्यांच्या सभांना महिलांचा प्रतिसाद अधिक असल्याचे तिन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. लाडकी बहीण योजना कदापिही बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही तिघेही सभांमधून देत आहेत.

कोणालाच अंदाज येईना

सर्वच पक्षांनी युती व आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिल्याने प्रत्येक शहरातील राजकीय चित्र वेगळे आहे. 'मेरा गाव, मेरा देश' अशा पद्धतीने प्रत्येक शहरातील राजकीय परिस्थिती वेगवेगळी दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीप्रमाणे नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाचा अंदाज एकत्रितपणे करणे कठीण जात आहे.-राजकीय विश्लेषकांनाही निवडणुकीचा अंदाज येत नाही.

काँग्रेसच्या स्वबळाच्या प्रयोगाकडे लक्ष

काँग्रेसने बऱ्याच ठिकाणी स्वबळाचा प्रयोग केला आहे. गेली अनेक वर्षे आघाडीमध्ये राहून पंजा आक्रसला. आता तो प्रत्येक ठिकाणी गेला पाहिजे असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मत आहे आणि त्या दृष्टीने काँग्रेसने रणनीती आखली आहे.

महायुती सरकारचे अपयश, सत्ता पक्षाची निवडणुकीतील दादागिरी, पैशांचा गैरवापर आणि मतचोरी या मुद्द्यांवर ते टीका करत आहेत. हा प्रयोग कितपत यशस्वी झाला, यावर निकालानंतरच शिक्कामोर्तब होईल.

भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट यांचा थेट मुकाबला काँग्रेसशी असल्याचे चित्र आहे. काँग्रेस संपली असे मानणाऱ्यांना निवडणूक निकालात उत्तर मिळेल. नगरसेवकांची आमची संख्या खूप मोठी असेल असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत.

काँग्रेसने १५१ नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंजावर उभे केले आहेत. नगरसेवक पदासाठी ३ हजार उमेदवार उभे केले आहेत. विदर्भात सर्वाधिक यशाची काँग्रेसला अपेक्षा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Big leaders' prestige at stake in municipal council elections.

Web Summary : Maharashtra's municipal council elections see top leaders campaigning intensely. Alliances are fluid, with focus on development. Internal strife within ruling parties and Congress' solo efforts add intrigue. Results will reveal political impact.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकElectionनिवडणूक 2024BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस