शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

२९० कोटींच्या पंचायत राज अभियानासमोर अडचणीच अडचणी; अभियान लोकचळवळ बनण्याची शक्यता नाही, कारण..

By समीर देशपांडे | Updated: October 11, 2025 18:22 IST

ग्रामविकास विभागाचे महत्त्वाकांक्षी अभियान म्हणून या अभियानाकडे पाहिले जाते

समीर देशपांडेकोल्हापूर : ग्रामविकास विभागाच्या वतीने तब्बल २९० कोटी रुपयांचे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ १७ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाले खरे. परंतु, त्यानंतर महाराष्ट्रात अभूतपूर्व पूरस्थिती उदभवल्याने ग्रामीण महाराष्ट्राचा ‘मूड’ बदलला आहे. त्यात पदवीधर निवडणुकीची नोंदणी, जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता, शिक्षकांच्या बदल्या, दिवाळीचा माहोल, हजारो ग्रामपंचायतींवर असणारे प्रशासक यामुळे हे अभियान लोकचळवळ बनण्याची शक्यता नाही, असेच सध्याचे चित्र आहे.ग्रामविकास विभागाचे महत्त्वाकांक्षी अभियान म्हणून या अभियानाकडे पाहिले जाते. यातील यशस्वी ग्रामपंचायतींना तब्बल २४५ कोटी २० लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अभियान सुरूही झाले. परंतु, त्यानंतर महाराष्ट्रातील सामाजिक, नैसर्गिक, राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. २९ जिल्ह्यात पूरस्थिती उदभवली. अनेकांचा मृत्यू झाला. अनेकांनी आत्महत्या केली. शासनाला यासाठी ३२ हजार कोटींचे पॅकेजही जाहीर करावे लागले.दिवाळी संपल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे पूर आलेल्या गावांमध्ये ग्रामस्थ आपले घर सावरायच्या मागे लागले आहेत. जानेवारीअखेर आता कोणत्या कोणत्या निवडणुका लागणार याकडे लक्ष लागले आहे. यामुळे अशा अभियानांचा कणा असलेले कार्यकर्ते हे राजकीय प्रचारात गुंतलेले राहणार आहेत. त्यामुळे हे अभियान स्थगित केले नाही, तर त्याचा अपेक्षित परिणाम दिसणार नाही.

..अशा आहेत अडचणी

  • पूरस्थितीच्या गावांमध्ये ग्रामस्थ अडचणीत आल्याने अस्वस्थ आहेत.
  • जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता, कार्यकर्ते अडकणार प्रचारात
  • सर्व लक्ष राहणार प्रचार, निवडणुकांवर
  • पदवीधर मतदार नोंदणीसाठी काही जिल्हा परिषदांचे अधिकारी प्रशिक्षणात.
  • राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक.

हे अभियान संपूर्ण यशस्वी होण्यासाठी सध्याची वेळ योग्य वाटत नाही. मराठवाडा, विदर्भामध्ये ग्रामस्थ अडचणीत आहेत. निवडणुकांचे वातावरण आहे. ग्रामविकास विभागाने या अभियानाचे नव्याने वेळापत्रक जाहीर केल्यास ते योग्य ठरणार आहे. - दत्ताभाऊ काकडे, अध्यक्ष, सरपंच परिषद, महाराष्ट्र

English
हिंदी सारांश
Web Title : Challenges Plague ₹290 Crore Panchayat Raj Abhiyan; Unlikely to Become People's Movement

Web Summary : The ₹290 crore Panchayat Raj Abhiyan faces hurdles: floods, elections, administrators. Unlikely to become a people's movement due to changed circumstances.