शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 06:43 IST

ठाण्यात संमेलन झाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तर पुण्यात संमेलन झाले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यजमानपद जाईल. त्यामुळे एका अर्थाने महायुतीतीलल संघर्षाची किनार संमेलनालाही प्राप्त होणार आहे

प्रज्ञा म्हात्रे ठाणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाकरिता पुणे व ठाणे या सांस्कृतिक राजधानी, उपराजधानीत चुरस सुरू झाली आहे. दोन्ही शहरांतील साहित्यिक हे संमेलन आपल्याच शहरात व्हावे, याकरिता आग्रही आहेत. त्यामुळे ठाण्यातील झणझणीत मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यिक ठाण्यात पायधूळ झाडतात की श्रीखंड-पुरीच्या बेताकरिता पुण्याला जातात, अशी चर्चा आहे. 

ठाण्यात संमेलन झाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तर पुण्यात संमेलन झाले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यजमानपद जाईल. त्यामुळे एका अर्थाने महायुतीतीलल संघर्षाची किनार संमेलनालाही प्राप्त होणार आहे. यंदाचे ९९ वे साहित्य संमेलन २०२६ मध्ये साताऱ्यात पार पडणार असून त्यानंतर शतकोत्तर संमेलनाचा मान कोणाला मिळणार यावर आता साऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. मराठी साहित्य संमेलनाची परंपरा पुण्यातूनच सुरू झाल्याने ‘शंभरावे संमेलन पुण्यालाच’, असा भावनिक दावा पुण्यातील साहित्यिकांनी केला आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे मुख्य दफ्तर पुण्यात असल्याने ‘निर्णायक फाइल’ पुणेकरांच्या हातात आहे.  

भक्कम आर्थिक शक्ती ठरणार निर्णायकमुंबई मराठी साहित्य संघाचे जुने मंडळ पुन्हा निवडून आल्यामुळे मुंबईची मागणी कितपत मान्य होईल, याबद्दल साशंकता आहे. दरवर्षी संमेलनाचा खर्च वाढत चालल्याने ‘भक्कम आर्थिक शक्ती असलेली राजकीय छत्री’ हा घटक निर्णायक ठरणार आहे. अशी छत्री ठाणे व पुण्यात नक्की आहे. याशिवाय संमेलनाध्यक्ष पदासाठी भालचंद्र नेमाडे व रंगनाथ पठारे यांची नावे चर्चेत आहेत. 

...तर संमेलन नागपूरला?ठाणे की पुणे रस्सीखेच वाढली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले निर्णायक मत वापरून शंभरावे साहित्य संमेलन नागपूरला नेऊ शकतात.

९९ वे साहित्य संमेलन अद्याप पार पडायचे आहे. त्यामुळे शंभरावे संमेलन कोणत्या शहरात होईल, त्याचे यजमानपद कोणाला मिळेल, याबाबत सध्या चर्चा करणे योग्य ठरणार नाही. महामंडळाची एक स्पष्ट आणि अनुशासित प्रणाली आहे. त्यानुसार हा निर्णय महामंडळ घेईल.- मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

English
हिंदी सारांश
Web Title : Thane's Misal or Pune's Shrikhand: Race for Marathi Sahitya Sammelan?

Web Summary : Thane and Pune compete to host the 100th Marathi Sahitya Sammelan. Political influence and financial strength will likely decide the venue, with Nagpur as a possible alternative. Discussions around potential presidents like Bhalchandra Nemade are also underway.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन