शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त गावातील जलस्त्रोत होणार बळकट

By admin | Updated: February 25, 2015 02:04 IST

जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या व महसूल विभागाने ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर केलेल्या टंचाईग्रस्त गावांमधील जलस्त्रोतांची दुरुस्ती

जितेंद्र दखणे, अमरावतीजलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या व महसूल विभागाने ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर केलेल्या टंचाईग्रस्त गावांमधील जलस्त्रोतांची दुरुस्ती, बळकटीकरण केले जाणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीवाय) महात्मा फुले जल आणि भूमी संधारण अभियानातून राज्यासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या अभियानांतर्गत पाझर तलाव, माती नाला बांध, सिमेंट नालाबांध, पिण्याचे पाण्याचे स्त्रोत यांचे बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे, खोल सलग समपातळी चर ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत. त्यानुसार टंचाईग्रस्त गावातील पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, शिवकालीन, ब्रिटिशकालीन निजामकालीन ऐतिहासिक तलावातील गाळ लोकसहभागातून काढला जाईल़ ज्या ठिकाणी लोकसहभाग मिळणार नाही त्या ठिकाणी गाळ काढण्यासाठी यंत्राचा वापर करुन फक्त डिझेलसाठी निधी दिला जाईल. पाणलोट क्षेत्रात दुरुस्तीसाठी जलस्त्रोत नसल्यास तेथे डोंगर उतारावर खोल सलग समपातळी चर खोदण्यात येईल. जलयुक्त अभियानाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी कार्यशाळा, सरपंच मेळावे, दिंडी, पथनाट्य, शालेय स्पर्धा घेतली जाणार आहे़ भित्तीपत्रके, चित्रफिती, संदेशातून लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.