शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

‘राज्यपाल हटाव’च्या चर्चेने विचित्र अनिश्चितता

By admin | Updated: June 18, 2014 04:27 IST

उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी यांनी राजीनामा दिल्याची खुद्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पुष्टी केली.

हरीष गुप्ता, नवी दिल्लीआधीच्या संपुआ सरकारने नेमलेल्या किमान सात राज्यांच्या राज्यपालांना पदे सोडण्याचे निरोप केंद्र सरकारकडून धाडण्यात आल्याचे वृत्त दिवसभर राजकीय वर्तुळात जोरात असतानाच उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी यांनी मंगळवारी राजीनामा दिला. मात्र इतर राज्यपालांपैकी किमान तिघांनी राजीनाम्याचा इन्कार केल्याने, दोघांनी राष्ट्रपतींची तर एकाने पंतप्रधानांची भेट घेतल्याने आणि विशेष म्हणजे या सर्व घडामोडींवर मोदी सरकाकडून कोणतेही अधिकृत भाष्य न करण्यात आल्याने दिवअखेर एक अनिश्चितता कायम राहिली.उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी यांनी राजीनामा दिल्याची खुद्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पुष्टी केली. मात्र इतर राज्यपालांनाही राजीनामे द्यायला सांगितले आहे का यावर ते काहीच बोलले नाहीत. पण ‘मी त्यांच्या जागी असतो तर यापूर्वीच राजीनामा दिला असता,’ असे सूचक भाष्यही त्यांनी केले. ए.के. नारायणन् (प. बंगाल), शीला दीक्षित (केरळ), मार्गारेट अल्वा (राजस्थान), कमला बेनिवाल (गुजरात), के. शंकरनारायणन् (महाराष्ट्र) आणि देवेंद्र कोनवार (त्रिपुरा) या आधीच्या सरकारने नेमलेल्या राज्यपालांना केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी फोन करून राजीनामे देण्याचे संकेत दिल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले. त्यामुळे मोदी सरकारने राज्यपालांना बदलण्याचा घाट घातला आहे, असे तर्कही लढविले गेले.