शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा जाळल्याने वादळे येतच राहणार, Madhav Gadgil यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 08:19 IST

Madhav Gadgil News: कोळसा मोठ्या प्रमाणावर जाळला जातोय. परंतु, त्यातून पुरेशी वीजनिर्मिती होत नाही. जगात आपण सर्वाधिक कोळसा जाळतोय. यासाठी मोठे उद्योजक गुंतले आहेत.

पुणे : विकास करायचा म्हणून आज अनेक गोष्टींवर भर दिला जात आहे. कोळसा मोठ्या प्रमाणावर जाळला जातोय. परंतु, त्यातून पुरेशी वीजनिर्मिती होत नाही. जगात आपण सर्वाधिक कोळसा जाळतोय. यासाठी मोठे उद्योजक गुंतले आहेत. पण कोळसा जाळल्याने त्यातून एरोसोल (सूक्ष्म कण) वातावरणात जातात. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो तसेच पर्यावरण बिघडून हवामान बदलते. कोकणात गेल्यावर्षी जो पाऊस झाला, त्याला हेच कारण असू शकते, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले. इकॉलॉजिकल सोसायटी, पुणेतर्फे जून २०१९मध्ये कोकणात झालेल्या निसर्ग वादळाबाबतचा अभ्यास करून  ‘निसर्ग चक्रीवादळ २०१९ निसर्गाचे थैमान’ ही अहवाल तयार करण्यात आला असून त्याचे ऑनलाईन प्रकाशन गाडगीळ यांच्या हस्ते झाले. सोसायटीच्या डॉ. स्वाती गोळे, अजय फाटक, केतकी घाटे, मानसी करंदीकर आदी यावेळी उपस्थित होते. गुरूदास नूलकर, हर्षद तुळपुळे, अक्षय चव्हाण, समीर दुमाणे, कविता शिंदे यांनी हा अहवाल तयार केला आहे. गौरी बर्गी व नीलम कर्ले यांनी लिखाणात मदत केली आहे. गाडगीळ म्हणाले, ‘संपूर्ण देशातील सुमारे २० टक्के जमीन देवराईसाठी राखीव आहे. पूर्वी संपूर्ण भारत हिरवाईने आच्छादलेला होता.  पूर्वी ग्रामसभा ही हिरवाई जपत असत. पण १९७२मध्ये कायदा आला आणि वन विभागाच्या ताब्यात सर्व जमिनी गेल्या. त्यानंतर वन विभागाने पैसेवाल्यांसाठी काम करून ग्रामसभेला मात्र त्रास दिला. आज तर विकासाच्या नावाखाली काहीही केले जाते. यामुळे अडचणी येतच राहणार असे ते म्हणाले. 

...म्हणून समुद्रकिनारा उथळ झालाय nशास्त्रीय पुराव्याप्रमाणे समुद्राची पातळी जगभर, विशेषत: उष्ण कटिबंधात अपेक्षेहूनही भराभर वाढते आहे. त्यात भर घालायला इथे इमारतींच्या भाराने आणि भूजलाची पातळी खाली गेल्यामुळे जमीन खचते आहे. nशिवाय डोंगरांवरची झाडी तुटल्यामुळे आणि खाणींसाठी डोंगर खोदत असल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ साचून नद्यांच्या, खाड्यांच्या मुखाशी व इतरत्रही समुद्रकिनारा उथळ झाला आहे, असे गाडगीळ म्हणाले.

टॅग्स :environmentपर्यावरणIndiaभारत