शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 22:47 IST

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने दोन गटात हिंसाचार उसळला.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने दोन गटात हिंसाचार उसळला. यवतमधील बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली आणि काही घरांना पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. शिवाय, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती कोल्हापूरचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.

सुनील फुलारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमधील परिस्थिती आता नियंत्रणात आणि सामान्य झाली आहे. परंतु, हिंसाचारादरम्यान गावकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दोन कारच्या खिडक्या फोडल्या गेल्या, एक मोटारसायकलही जाळण्यात आली, गावातील एका बेकरीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एवढेच नाही तर, काही समाजकटंकांनी धार्मिक प्रार्थनास्थळातही तोडफोड केली. 

पुढे फुलारी म्हणाले की, "या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या हिंसाचारात सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या गावातील एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत."

टॅग्स :daund-acदौंडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे