शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 21:20 IST

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान सोमवारी हस्तांतरित करण्यात येईल, अशी घोषणा ...

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान सोमवारी हस्तांतरित करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. या माध्यमातून सुमारे ६५ लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व्यक्ती संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणारे कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, शेतकरी महाराष्ट्राचे खरे ब्रांड एम्बेसिडर आहेत. त्यामुळे यापुढे दरवर्षी त्यांचा कौतुक सोहळा होईल. पुरोगामी महाराष्ट्राला शोभेल अशा पद्धतीने पुरस्कार रक्कम चौपट वाढवली आहे. पाऊस जास्त झाल्याने होणारे नुकसान भरपाईसाठी पंचनामे सुरू आहेत. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान उद्याच हस्तांतरित करण्यात येईल. त्यामध्ये ६५ लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीक विमा योजनेत अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कांदा निर्यात बंदी बाबत सुद्धा मदत केल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागची बाकी शून्य आणि पुढचे बिल शून्य असणारी वीज बिले लवकरच प्राप्त होतील, असेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आश्वासित केले. 

यावेळी  शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय कोणताही सशक्त समाज आणि राष्ट्र निर्माण शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. राज्यपाल पुढे म्हणाले की, देशातील १४० कोटी लोकांना शेतकऱ्यांशिवाय भविष्य नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीशी शेतकरी ठामपणे उभा होता. त्यामुळे ते मोठा इतिहास रचू शकले, हा महाराष्ट्राचा महान इतिहास आहे. महाराष्ट्र राज्याने राबवलेली १ रुपयात विमा योजना ऐतिहासिक आहे, अशा शब्दात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शासनाच्या कृषी योजनेचे कौतुक केले.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग इतर शेतकऱ्यांना करून द्यावा त्यांनी समाजात कृषी मार्गदर्शक दुत म्हणून काम करावे असे आवाहन केले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीAgriculture Schemeकृषी योजना