शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना कोणी विचारेना; महामंडळाकडून विचारपूस करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 19:46 IST

राज्यभरात ८ जुलैपर्यंत एकूण २३९ कर्मचारी कोरोना बाधित झाले होते. मात्र यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला. तर,  १६८ कोरोना बाधित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहे. ६५ कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले आहेत. 

- कुलदीप घायवट

मुंबई : लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याची ने-आण करण्यासाठी एसटी कर्मचारी तत्पर आहे. मात्र हि सेवा देताना एसटी कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली. मुंबई विभागासह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागेल. अनेक कर्मचारी आता रुग्णांलयात, कोरोना विलीगीकरण कक्षात दाखल झाले आहेत. मात्र त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कोणतीही विचारपूस केली जात नाही. औषध व इतर बाबींना आर्थिक मदत केली जात नसल्याची व्यथा एसटी कर्मचार्यांनी मांडली. 

एसटी महामंडळाकडून कोरोना बाधित एसटी कर्मचाऱ्याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आगारपातळीवर सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनेने केला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेष काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना एसटी महामंडळाने राज्यभरातील विभागांना पत्राद्वारे दिले आहे. कोरोना विषाणू बाधित एसटी कर्मचाऱ्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांना मानसिक आधार द्यावा. विभाग नियंत्रक, कामगार अधिकारी, संबंधित आगाराच्या आगार व्यवस्थापकांनी  वैयक्तिक लक्ष देऊन बाधित कर्मचाऱ्यांची त्याच्या कुटुंबियांची वारंवार चौकशी करून धीर द्यावा. कोरोनाबाधित कर्मचारी आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करून, वैद्यकीय सल्ल्यानुसार विलगीकरण करणे आवश्यक असल्यास त्यांचे तत्काळ विलगीकरण कारण्याबाबत आरोग्य विभाग / स्थानिक प्रशासनास कळविण्यात यावे, अशा सूचना एसटी महामंडळाकडून राज्यभरातील आगारांना दिल्या होत्या. मात्र अधिकारी वर्ग विचारपूस करत नाही. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी बोलविण्यात येत होते. मात्र आता कोरोना झाल्यामुळे कोणी फोन करत नाही. फक्त मोजक्यांनीच विचारपूस केली आहे. विचारपूस करून मानसिक आधार द्यावा, मनोबल वाढवावे, एवढीच  इच्छा आहे, अशी व्यथा एसटी कर्मचारी मांडत आहेत. 

आगार पातळीवर एसटीमधील कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची साधी चौकशी केली जात नाही. जे उपचार घेत आहेत, त्यांना रुग्णालयातील अडचणीना सामोरे जावे लागत आहे. या अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जात नाही. औषधे व इतर बाबींना आर्थिक मदत केली जात नाही. 

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस 

१६८ कोरोना बाधित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु; ६५ कर्मचारी बरे 

राज्यभरात ८ जुलैपर्यंत एकूण २३९ कर्मचारी कोरोना बाधित झाले होते. मात्र यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला. तर,  १६८ कोरोना बाधित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहे. ६५ कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस