शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

माती परीक्षण आता एका मिनिटात!

By admin | Updated: March 18, 2015 01:22 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात टेक्सास विद्यापीठाचे डेव्हिड सी. विनडॉर्फ यांचे मार्गदर्शन.

राजरत्न सिरसाट/अकोला : माती परिक्षणाच्या पारंपरिक पद्धतीवर अमेरिकेने मात केली असून, उपग्रहाद्वारे अवघ्या एका मिनिटात परिपूर्ण अहवाल देणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. शेतकर्‍यांना शेतातील मातीचा सामू बघून कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, याचा ताळमेळ बसवून हमखास उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विदर्भात करण्यासाठीचा करार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत केला असून, अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठात कार्यरत या तंत्रज्ञानाचे जनक तथा कृषी विज्ञान आणि नैसर्गिक संसाधन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता (संशोधन) डॉ. डेव्हिड सी. विनडॉर्फ हे येथील शास्त्रज्ञ, विद्यार्थ्यांना १६ मार्चपासून प्रशिक्षण देत आहेत.माती परीक्षणाचे हे एक्सआरएफ तंत्रज्ञान आहे. मातीचा प्रत्यक्ष नमुना न घेता त्यामध्ये कोणते मूलद्रव्य कमी आहेत, हे केवळ साठ सेकंदात सांगता येते आणि तीन तासांत जवळपास १८0 मातीचे नमुने या तंत्रज्ञानाने काढण्यात येतात. प्रामुख्याने शेतातील गंधक, जिप्सम आदी सर्वच घटकांसह मुख्य व दुय्यम अन्नद्रव्ये शोधली जातात.माती परीक्षण केले तर मातीचा सामू कळतो. मातीत कोणते गुणधर्म कमी आहेत, हे समजते आणि त्यावर उपाययोजना म्हणून कोणती खते वापरावीत, याचे नियोजन करता येते. त्यामुळे शेतकर्‍यांना योग्य ते उत्पादन घेण्याचा मार्ग मोकळा होतो. माती परीक्षणाचे तंत्रज्ञान आहेच, पण या नवीन यंत्राचा वापर वीस वर्षांपूर्वी झाला होता. यामध्ये नवे संशोधन करण्यात आले आहे. जलतपासणीसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची शुद्धता तपासली जाते. पाण्यात कोणती जड तत्त्वे, जलप्रदूषक आहेत, हे लगेच कळते. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होत असल्याने या तंत्रज्ञानाचा अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विदर्भात करण्यासाठी डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी टेक्सास विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला असून, हे तंत्रज्ञान कसे वापरावे, यासाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी डॉ. विनडॉर्फ येथे आले आहेत.