शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

Shrikant Shinde : "दादा हा 'शो' नाही, पहाटेच्या फ्लॉप 'शो'सारखा… हा 'शो'ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा!"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 9:00 AM

Shrikant Eknath Shinde And Ajit Pawar : अजित पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई - राज्यातील सत्तांतरानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यात येत्या दसरा मेळावा कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. परंतु यंदा दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला आहे. यात आता राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उडी घेत दोन्ही गटाला सुनावलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता ते त्यांना पाहिजे असेल तसं करतात. त्यामुळे वाद घालून चालणार नाही. सर्वसामान्य जनता कुणाच्या पाठिशी आहे हे शिवाजी पार्कवरील सभा झाल्यावर कळेल. त्याचसोबत निवडणुका झाल्यावर कुणाची शिवसेना खरी हेदेखील कळेल असं म्हटलं आहे. 

अजित पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Eknath Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "दादा हा 'शो' नाही, पहाटेच्या फ्लॉप 'शो'सारखा… हा 'शो'ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा!" अस म्हणत खोचक टोला लगावला आहे. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "दादा हा 'शो' नाही, पहाटेच्या फ्लॉप 'शो'सारखा… हा 'शो'ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा! आणि हो… हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या 'ट्रेलर'नेच धडकी भरली?.... पिक्चर अभी बाकी है!!!" असं श्रीकांत शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच khatteangur हा हॅशटॅग देखील वापरला आहे. 

अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर टीका

अजित पवार यांनी माध्यमांकडे सध्या कुठल्या बातम्या नाहीत. अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीसांनी भेटीबाबत नकार दिलाय. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने काम करत असतो. जनता निवडून देत असते. गणेशोत्सव वर्षानुवर्षे सुरू आहेत. यंदा गाठीभेटी वाढल्या आहेत. परंतु आम्हीही गणपतीच्या दर्शनासाठी जातो पण कॅमेरा घेऊन जात नाही. जो गणेशभक्त आहे त्याने अशाप्रकारे देखावा दाखवण्याचं कारण नाही. पूर्वीच्या काळात शोमॅन होते, राज कपूर शोमॅन म्हणून ओळखले जायचे तसं हल्ली काहींना शो करायची सवय आहे. जनतेनेच बघावे काय चाललंय काय नाही असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

"दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांनी घ्यावा"

बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी दिलीय. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना आहे. त्यांना बाळासाहेबांचे विचार सांगण्याचा अधिकार नाही. खरी शिवसेना कुणाची याबाबत न्यायदेवता निर्णय देईल. उद्धव ठाकरे ज्यावेळी म्हटले बाळासाहेब साधे होते, मी हुशार आहे. त्यादिवशी महाराष्ट्राच्या जनतेला कळालं. शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईवर ते गादीवर बसले. आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना आहोत. त्यामुळे दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांनी घ्यावा अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करणार आहे असं शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे