शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना आमचे ‘टार्गेट’ नाही

By admin | Updated: September 29, 2014 00:23 IST

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजपावर शरसंधान केल्यावर भाजपाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात आमचे मुख्य ‘टार्गेट’

भाजपाची सडेतोड भूमिका : शिवसेना स्पर्धेतही नाहीनागपूर : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजपावर शरसंधान केल्यावर भाजपाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात आमचे मुख्य ‘टार्गेट’ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस असून शिवसेना आमच्या स्पर्धेत नाहीच. त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला वेळदेखील नाही, असे प्रत्युत्तर देऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांच्या टीकेला पक्षाने फारसे गंभीरतेने घेतले नसल्याचे सूतोवाच केले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या विधानसभा निवडणुकांमध्ये भाषा, प्रांत, धर्म, संप्रदाय हा मुद्दाच नाही. सुशासन व विकास याच मुद्यावर जनता मतदान करेल आणि राज्यातील ‘व्हिलन’ कोण हे जनताच ठरवेल. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेवरून दूर करुन सुशासन प्रस्थापित करणे हे आमचे लक्ष्य आहे असे ते म्हणाले. बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या सुलेखा कुंभारे यांनी यावेळी भाजपाला पाठिंब्याची घोषणा केली.आगे आगे देखिए होता है क्याशिवसेनेसोबत युती तोडल्यानंतर आता वेगळ्या विदर्भाबाबत भाजपाची भूमिका काय याकडे विदर्भवाद्यांचे लक्ष लागले आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लहान राज्यांबाबत भाजपा सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. लहान राज्यांची संकल्पना भाजपाने स्वीकारली आहे. परंतु नवीन लहान राज्ये निर्माण करताना दोन्ही राज्यांना योग्य सन्मान देण्याची गरज आहे. तसेच त्यांना समृद्ध करण्यासाठी योग्य आराखडादेखील असणे आवश्यक आहे. कॉंग्रेसने तेलंगणाच्या निर्मितीच्यावेळी नेमकी हीच चूक केली, असा टोला त्यांनी लगावला. वेगळा विदर्भ नेमका कधी करणार या प्रश्नावर ‘आगे आगे देखिए होता है क्या’ असे उत्तर त्यांनी दिले.