शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

“लोकसभेला झाले ते आता विधानसभेला होणार नाही”; श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:02 IST

MP Shrikant Shinde News: महायुती सरकार चांगले काम करत आहे, त्यामुळे विरोधकांना भीती वाटत आहे. विरोधकांना फक्त राजकारण करायचे आहे, अशी टीका श्रीकांत शिंदेंनी केली.

MP Shrikant Shinde News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही बैठका, मेळावे यांचे सत्र सुरू झाले आहे. महायुतीचे सरकार पुन्हा यावे, यासाठी तीनही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथे जनसंवाद मेळावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना, विधानसभा निवडणुकीत विधानसभेसारखी परिस्थिती असणार नाही, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. 

नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा खासदार श्रीकांत शिंदे घेणार आढावा घेणार आहेत. तसेच काही बैठकाही घेण्यात येणार आहेत. पत्रकारांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर चांगलेच टीकास्त्र सोडले. विरोधकांना फक्त राजकारण करायचे आहे. गेल्या २ वर्षांत सरकार चांगले काम करत आहे, त्यामुळे त्यांना भीती वाटत आहे. लोकसभेत गैरसमज पसरवून तुम्ही लोकांचे मत घेतली, ते आता विधानसभेत होणार नाही. तुमची सत्ता असताना अडीच वर्षात फक्त घरी बसण्याचे काम केले. सगळ्या विकासकामांत खोडा घालण्याचे काम तुम्ही केले, या शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी हल्लाबोल केला. 

कोण कुठल्या जागेवर निवडणूक लढतील यावर निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल

कोण कुठल्या जागेवर निवडणूक लढतील यावर निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. आता फक्त पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आहे. लाडकी बहीण योजनेबाबत माहिती घेतली आहे. योजना जाहीर झाल्यानंतर लाभार्थींना काही अडचणी येत आहेत का याबाबत आढावा घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

दरम्यान, लग्न होत नाही, सत्ता येत नाही म्हणून राहुल गांधी जुडो कराटे खेळत असावे. काहीतरी मनोरंजन लागेल ना त्यांना, पोरगा आहे खेळू द्या. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून देशाचा आलेख चढता आहे. मोदी है तो मुमकीन है हेच सत्य आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेना