शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारसभेतील गर्दी पाहून शरद पवारही भारावले

By admin | Updated: October 10, 2014 01:02 IST

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार गोटीराम पवार यांच्या प्रचारासाठी मुरबाडमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार गोटीराम पवार यांच्या प्रचारासाठी मुरबाडमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. प्रचार सभेला झालेली गर्दी पाहून खुद्द पवार हेदेखील भारावून गेले. छायाचित्र काढण्यासाठी पुढे सरसावलेल्या छायाचित्रकारांना त्यांनी गर्दीचा फोटो काढण्याचा सल्लाही दिला. उमेदवार गोटीराम पवार यांच्या प्रचारासाठी ते आले होते. तब्बल ८ हजारांहून अधिक जनसमुदाय सभेला आला होता. भर उन्हातदेखील कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा होता. पवार भाषणाला उभे राहिल्यावर ते कथोरेंवर काहीतरी टीका करतील, ही अपेक्षा मतदारांना होती. त्याप्रमाणे त्यांनी कथोरेंची खिल्ली उडवून भाजपाला कडाडून विरोध केला. आघाडीच्या सरकारमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा आरोप भाजपा करीत असेल तर भाजपा गुन्हेगारांना उमेदवारी का देते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या आरोपानंतर संपूर्ण सभेत टाळ्यांचा कडकडात झाला. गोटीराम पवार यासारख्या सज्जन माणसाला मुरबाडकर निवडून देतील, असा विश्वास शरद पवार यांनी या वेळी व्यक्त केला. या सभेदरम्यान अनेक काँग्रेस आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सभेला पालकमंत्री गणेश नाईक, आर.सी. पाटील, प्रमोद हिंदुराव, सुभाष पिसाळ, दशरथ तिवरे, श्रीधर पाटील आणि उमेदवार गोटीराम पवार उपस्थित होते.(प्रतिनिधी)