शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळातील सात ठार

By admin | Updated: May 26, 2014 01:12 IST

वास्तुशांती व लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठी वाशिम तालुक्यातील टनका या गावी आलेले मुंबई येथील जोगेश्‍वरी भागातील एका कुटुंबीतील सदस्य मुंबईस परतण्यासाठी वाशिमकडे येत असताना

दोन अपघात : मुंबईकडे जाताना वाशिम येथे मायलेकांसह तिघांचा मृत्यू

वाशिम : वास्तुशांती व लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठी वाशिम तालुक्यातील टनका या गावी आलेले मुंबई येथील जोगेश्‍वरी भागातील एका कुटुंबीतील सदस्य मुंबईस परतण्यासाठी वाशिमकडे येत असताना त्यांची टोयाटो क्वॉलीस जीप रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातामध्ये मायलेकीसह तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमीमध्ये तीन बालकांसह १0 जणांचा समावेश आहे. ही घटना वाशिम ते हिंगोली महामार्गावरील तोंडगाव फाट्यानजीक २४ मेच्या उत्तररात्री ३ वाजताच्या सुमारास घडली.

या अपघातामध्ये सिंधू डिगांबर भालेराव, वैष्णवी डिगांबर भालेराव (माय-लेकी) व वसंत योगीराज कांबळे या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमीमध्ये सुवर्णा वसंत कांबळे, प्रणिता विजय इंगोले, गुंजन विनोद राऊत, सचिन वसंत कांबळे, स्नेहा वरुण कांबळे, तन्वी विनोद राऊत, वेदांत विनोद इंगोले, विनोद धोंडबा राऊत व वाहन चालक विजय देवीदास इंगोले यांचा समावेश आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे वास्तव्य असलेले डिगांबर रामा भालेराव यांचे कुटुंब गेल्या १५ ते २0 वर्षांंंंपासून जोगेश्‍वरी वेस्ट मुंबई येथे वास्तव्य करीत आहेत. वाशिम तालुक्यातील सोंडा व टनका येथे वास्तुशांती व लग्नसमारंभाच्या निमित्ताने भालेराव, इंगोले, राऊत व कांबळे कुटुंब आले होते. यामध्ये डिगांबर रामा भालेराव, त्यांच्या पत्नी सिंधू डिगांबर भालेराव, मुलगी वैष्णवी डिगांबर भालेराव (१४), वसंत योगीराज कांबळे (३६), सुवर्णा वसंत कांबळे (२८), प्रणिता विजय इंगोले (२५), गुंजन विनोद राऊत (३0), सचिन वसंत कांबळे (१५), स्नेहा वरुण कांबळे (९), तन्वी विनोद राऊत (४), वेदांत विनोद इंगोले (३), विनोद धोंडबा राऊत व वाहन चालक विजय देवीदास इंगोले (२८) यांचा समावेश आहे.

हे कुटुंब मुंबईहून वाशिमला १७ मे रोजी आले होते. या कुटुंबाने नातेवाईकाकडील वास्तुशांती व लग्नसमारंभाचे कार्यक्रम आटोपले. आपल्या नातेवाईकाकडील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर वाशिम तालुक्यातील टनका येथून २४ मे रोजी रात्री २ वाजता मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघाले.

परतीच्या प्रवासाला वाशिमकडे येत होते. दरम्यान, तोंडगाव फाट्याजवळ रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत सीजी 0७ सीए 0८६७ क्रमांकाचा ट्रक उभा होता. या ट्रकला रिफ्लेक्टर व इंडिकेटर नसल्याने वाहनचालक विजय इंगोले याला ट्रक दिसला नाही. भरधाव वेगात असलेली क्वॉलीस जीप उभ्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की क्वॉलीस जीपचा अक्षरश: चुराडा झाला. (प्रतिनिधी)