ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 21:28 IST2026-03-22T21:18:40+5:302026-03-22T21:28:24+5:30

Datta Meghe Passes Away: विदर्भातील ज्येष्ठ राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक तथा राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचे रविवारी (२२ मार्च) नागपूर येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Senior leader, former minister of Maharashtra Datta Meghe passes away | ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

नागपूर -  विदर्भातील ज्येष्ठ राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक तथा राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचे रविवारी (२२ मार्च) नागपूर येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मेघे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला होता. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपमध्ये काम करत चार वेळा लोकसभा खासदार म्हणून नागपूर, रामटेक व वर्धा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय राज्यसभा सदस्य तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.

राजकारणासोबतच त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. ‘नागर युवक शिक्षण संस्था’च्या माध्यमातून तसेच ‘ दत्ता मेघे  इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स’सारख्या संस्थांच्या उभारणीतून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण व आरोग्य सुविधा पोहोचवल्या. त्यांच्या कार्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळाली.

मेघे हे विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीही राजकारणात सक्रिय असून पुत्र समीर मेघे आमदार आहेत.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे

Web Title : वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के पूर्व मंत्री दत्ता मेघे का निधन

Web Summary : वरिष्ठ राजनेता, शिक्षाविद और पूर्व मंत्री दत्ता मेघे का 89 वर्ष की आयु में नागपुर में निधन हो गया। चार बार सांसद रहे, उन्होंने अपनी संस्थाओं के माध्यम से शिक्षा और स्वास्थ्य सेवा का समर्थन किया, जिससे महाराष्ट्र के राजनीतिक और सामाजिक परिदृश्य में एक शून्य पैदा हो गया। वे एक अलग विदर्भ राज्य के पैरोकार थे।

Web Title : Veteran Leader and Former Maharashtra Minister Datta Meghe Passes Away

Web Summary : Datta Meghe, veteran politician, educator, and former minister, passed away in Nagpur at 89. A four-time MP, he championed education and healthcare through his institutions, leaving a void in Maharashtra's political and social landscape. He advocated for a separate Vidarbha state.