संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:07 IST2025-12-01T11:58:24+5:302025-12-01T12:07:53+5:30

दिल्लीतले २ महान नेते त्यांच्या पाठीशी आहेत असं शिंदेसेनेला वाटते, परंतु ते कुणाच्याच पाठीशी नाहीत असा टोला राऊतांनी लगावला. 

Sanjay Raut strongly criticized BJP along with Amit Shah, Eknath Shinde | संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."

संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."

मुंबई - आजारपणामुळे गेले काही दिवस सक्तीच्या विश्रांतीवर असलेले ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत पुन्हा मैदानात उतरले आहेत. राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत शिंदेसेनेवर पहिला घणाघात केला. शिंदेसेनेचा कोथळा अमित शाहच काढणार असं म्हणत राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले की, शिंदेसेनेचा कोथळा अमित शाहच काढणार हे माझे वाक्य लिहून ठेवा. दिल्लीतल्या शाहांची ही परंपरा आहे. त्यांनी आमचा कोथळा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही त्यातून बाहेर पडलो. त्यांच्या स्वभावानुसार, कार्यपद्धतीनुसार शिंदेसेनेचा कोथळा दिल्लीतूनच काढणार. शिंदेसेनेचे ३५ आमदार फुटणार आहेत. ज्यापद्धतीने आमच्यासोबत भाजपाने जे केले, त्याचरितीने शिंदेसेनेचे आमदार फोडण्याचं काम व्यवस्थित सुरू आहे. रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची नेमणूक खास त्यासाठीच आहे. ज्यांना राजकारण कळतं, त्यांनी ते समजून घेतले पाहिजे. आम्ही वारंवार तेच सांगतोय, डिसेंबरनंतर पाहा काय होते. दिल्लीतले २ महान नेते त्यांच्या पाठीशी आहेत असं शिंदेसेनेला वाटते, परंतु ते कुणाच्याच पाठीशी नाहीत असा टोला राऊतांनी लगावला. 

तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह यांना कायद्याच्या बाहेर जाऊन मदत केली. तरी त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही तिथे शिंदे कोण? शिंदेसेना फुटली आहे. अमित शाहांनी निर्माण केलेला हा गट आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आजही मजबुतीने उभी आहे. पैशाच्या ताकदीवर निवडणूक जिंकणे ही लोकशाही नाही. आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून नेतृत्व पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा होत्या, पण त्यांनाही भ्रष्ट नेत्यांना रोखण्यात अपयश आले आहे. पैशांवर माणसं विकत घेता येतात, त्यावर राजकारण चालत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, नारायण राणे भाजपाचे खासदार आहेत. भाजपाने आमदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल केला. कोकणात कशाप्रकारे पैशाचे वाटप होतंय हे दाखवण्याचा निलेश राणेंनी प्रयत्न केला. निलेश राणे यांचे आम्ही अभिनंदन करतो, त्यांचे आमचे मतभेद असतील. पण निवडणुकीत पैशाचे वाटप कसे होते हे त्यांनी दाखवले. याचा अर्थ शिंदेसेना पैसे वाटत नाही का? तर त्याहून अधिक वाटतायेत. कोकणात निलेश राणे यांनी कसे पैसे येतात, कसे वाटप होते यावर प्रकाश पाडला. निवडणूक आयोगाने निलेश राणेंची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला हे योग्य नाही असं संजय राऊत यांनी सांगितले.

Web Title : संजय राउत ने शिंदे पर निशाना साधा, अमित शाह द्वारा गुट के पतन की भविष्यवाणी

Web Summary : संजय राउत ने भविष्यवाणी की कि अमित शाह एकनाथ शिंदे के गुट को खत्म कर देंगे, उन्होंने दावा किया कि 35 विधायक दलबदल करेंगे। उन्होंने भाजपा की रणनीति की आलोचना की और चुनावों में धन के दुरुपयोग का आरोप लगाया, नीलेश राणे के कोंकण में नकद वितरण के खुलासे का समर्थन किया और चुनाव आयोग की कार्रवाई पर सवाल उठाए।

Web Title : Sanjay Raut Targets Shinde, Predicts Faction's Downfall by Amit Shah

Web Summary : Sanjay Raut predicts Amit Shah will dismantle Eknath Shinde's faction, claiming 35 MLAs will defect. He criticizes BJP's tactics and alleges misuse of money in elections, supporting Nilesh Rane's exposé on cash distribution in Konkan, while questioning the Election Commission's actions.