शहरं
Join us  
Trending Stories
1
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
2
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
3
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
4
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
5
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
6
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
7
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
8
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
9
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
10
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
11
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
12
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
13
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
14
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
15
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
16
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
19
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
20
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

“उद्या हे सांगतील मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले १०६ हुतात्मे जैन होते”: राऊत, शिंदेंवरही टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 11:35 IST

Sanjay Raut: सर्वांत आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे. ताराराणीचे असे धर्मांतर सुरू असताना मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प बसले आहेत, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वत:ला मराठी किंवा मराठा समजतात. त्यांच्या उपस्थितीत महाराणी ताराबाई यांचा वंश आणि कुळ बदलण्याचा प्रयत्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावर साधा निषेध केला नाही. महाराणी ताराराणी या जैन असल्याचा साक्षात्कार काही जैन मुनींना झाला. त्यांना असे का वाटले, ते मला माहिती नाही. त्यांच्याकडे बहुतेक काही शूर पुरुष किंवा वीरांगना नसल्यामुळे त्यांना असे वाटले असेल, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.

ताराराणी यांनी औरंगजेबाशी प्रचंड मोठी झुंज दिली. म्हणजे हंबीरराव मोहिते जैन होते का? हिंदू मराठा कुळात ताराराणी यांना जन्म झाला. शास्त्र जन्माला जागून त्यांनी तलवार आपल्या हातात घेतली. संपूर्ण महाराष्ट्राच एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या राजवटीत सुरू झालेला दिसतो, अशी टीका संजय राऊतांनी केली.

मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले १०६ हुतात्मे सुद्धा जैन होते! 

यासंदर्भात एक्सवर एक पोस्टही संजय राऊतांनी केली आहे. त्यात संजय राऊत म्हणाले की, काय सुरू आहे महाराष्ट्रात? शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले आहे? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या समोर सांगतात की महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! औरंगजेबाशी  झुंज देणाऱ्या वीरांगना ताराराणींचे धर्मांतर करण्याचा अधिकार याना दिला कोणी? ताराराणी शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकल्या सुनबाई म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या! ताराराणीचे असे धर्मांतर सुरू असताना मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प बसले आहेत, का? कशासाठी? उद्या हे सांगतील आमच्या मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले १०६ हुतात्मे सुद्धा जैन होते! यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवतील!, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.

सर्वांत आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे

पण तुम्ही आमचे राजे, महाराजे, महाराणी यांना तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात. म्हणजे तुमची विचारधारा, विकृती कोणत्या थराला गेली आहे. कुठे गेल्या आता मराठा संघटना? मराठी अस्मितेचे आमचे सहकारी. ताराराणी विषयी अशी वक्तव्य धर्मांतर दाखवणारी होत असतील तर नुसता निषेध करुन चालणार नाही. सर्वांत आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे. ते तिथे उपस्थित होते. त्यांनी तिथे साधे अवाक्षरही काढले नाही. कदाचित त्यांना ताराराणी माहिती नसेल त्यांनी ताराबेन ऐकले असेल. पण त्या ताराराणी आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी केला.

दरम्यान, धर्मांतर विरोधी कायदा आणलेला आपण महाराष्ट्रात. तुम्हाला धर्मांतर करता येणार नाही. तुम्ही आमच्या ताराराणींच जबरदस्तीने धर्मांतर करत आहात. याच्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. तुम्ही आमच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्येच ताराराणीचे, छत्रपती राजाराम यांच्या पत्नीचे, झुंजार वीरांगना ताराराणी यांचे अशा प्रकारे धर्मांतर करण्याचा अधिकार कोणी दिला? यामागे काय षड्यंत्र आहे?

English
हिंदी सारांश
Web Title : Raut Slams Shinde: Claims Martyrs Could Be Called Jain Tomorrow

Web Summary : Sanjay Raut criticizes Deputy CM Shinde for not opposing claims of Queen Tararani being Jain. He fears historical figures, even martyrs, might be falsely labeled Jain, questioning the government's silence and ideology.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती