शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सनातनवर बंदी घालाच!

By admin | Updated: September 20, 2015 01:00 IST

कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्या संस्थेवर

पुणे/ कोल्हापूर : कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्या संस्थेवर बंदी घालायला हवी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली. तर, या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांना क्लीन चिट देणारे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच हा बंदीचा प्रस्ताव विधानसभेत मांडावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कोल्हापुरात केली़पुण्यात श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात अशोक चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्राला वैचारिक स्वातंत्र्याची मोठी परंपरा आहे. ही परंपराच धोक्यात आणली जात आहे. हे राज्याच्या हिताचे नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या संस्थांवर बंदीच आणायला हवी. पानसरे यांच्या खुनाच्या तपासात प्रगती आहे, नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा मात्र अद्याप तपास नाही. राज्याचे गृहमंत्रिपद मुख्यमंत्र्यांच्याच ताब्यात आहे, ते आणखी किती दिवस हे पद स्वत:कडे ठेवणार, आता त्यांनी स्वतंत्र गृहमंत्री नियुक्त करायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी) सहकारमंत्र्यांनीच प्रस्ताव आणावापानसरे यांच्या खुनामागे हिंदुत्ववादी संघटना नाहीत, अशी क्लीन चिट सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती़ बजरंग दल, सनातन, आरएसएस या संघटना एकाच विचाराच्या जातकुळीतील आहेत़ या प्रकरणात पोलिसांनी पकडलेला संशयित समीर गायकवाड हा ‘सनातन’चा कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झाले आहे़ त्यामुळे सहकारमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडावा, अशी मागणी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात केली़ त्यांनी पानसरे कुटुंबीयांची सकाळी १० वाजता भेट घेतली़ या भेटीत पोलिसांनी हत्येमागील मास्टरमाइंड शोधून काढावा, तपास प्रक्रियेत राज्यकर्त्यांनी ढवळाढवळ करू नये, अशी मागणी कुटुंबीयांनी केली़ या भेटीनंतर पानसरेंच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते़तपासात हस्तक्षेप नाही - पाटीलपानसरे हत्येप्रकरणात जी काही कारवाई होईल, ती कायद्याच्या चौकटीत राहूनच होईल. यात राज्य शासन कोणताही हस्तक्षेप करीत नाही व करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘सनातन’ला क्लीन चिट देण्याचे वक्तव्य मी कधीच केले नव्हते. त्याचा साक्षात्कार राधाकृष्ण विखे-पाटील यांना आताच कसा झाला, अशी विचारणाही त्यांनी या वेळी केली.