शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 16:11 IST

"महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजपाच सोशल मीडियाच्या माध्यमातून दुफळीचे चित्र दाखवत आहे. मात्र अशी कोणतीही गोष्ट नाही."

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहे.'मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय कोर्टात आहे. सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे आणि निर्णय घेत आहे.'

पुणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सुरुवातीपासून होत आहे. यातच विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अंतर्गत वादातून पडणार असल्याचा दावा केला आहे. यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारमध्ये दुफळी असल्याचे चित्र भाजपाच दाखवत आहे. मात्र, अशी कोणतीही परिस्थिती नाही. देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजपाच सोशल मीडियाच्या माध्यमातून दुफळीचे चित्र दाखवत आहे. मात्र अशी कोणतीही गोष्ट नाही. देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही. त्यांना वाटत असेल, असेच काहीतरी व्हावे. पण,  सरकारमध्ये संवाद आणि चर्चा होत आहे. एक हाती कारभार आमच्यात नाही. आम्ही चर्चा करुन अनुभवाचा फायदा घेऊन लोकहिताचे निर्णय घेतो, असे रोहित पवार यांनी सांगितले.

याचबरोबर, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यासाठी यूजीसीकडून गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार येत्या सप्टेंबरच्या अखेरीस परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठांना देण्यात आले आहेत, यावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांविषयी सरकारने वेगवेगळ्या संघटनांशी बोलून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. देशात सर्व राज्यात सर्वात जास्त मुलं महाराष्ट्रात शिक्षण घेतात. त्यामुळे सर्वांचा एकत्रित निर्णय घेण्याऐवजी राज्याचा वेगळा निर्णय घेणे अपेक्षित आहे."

सारथी संस्थेबाबत रोहित पवार म्हणाले, "या प्रकरणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली आहे. इतर अनेक व्यक्ती बोलले आहेत. मी साधा कार्यकर्ता आहे. माझे आघाडीपेक्षा काही वेगळे म्हणणे नाही." तसेच,  मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय कोर्टात आहे. सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे आणि निर्णय घेत आहे. मात्र, हे प्रकरण कोर्टात असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

आणखी बातम्या...

घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल

अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी

Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता

21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी

चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस