शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरतीसाठी सुधारित पद्धत लागू; प्रक्रियेत पारदर्शकता, सुसूत्रता आणण्यासाठी सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:57 IST

जुने नियम रद्द होऊन नव्या सुधारित तरतुदी लागू होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील शिक्षक पदभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने पवित्र प्रणालीच्या कार्यपद्धतीत महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय शिक्षण विभागाने मंगळवारी जाहीर केला असून, यामुळे जुने नियम रद्द होऊन नव्या सुधारित तरतुदी लागू होणार आहेत.

प्रत्येक उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह या दोन प्रकरांपैकी  केवळ एका प्रकारासाठीच्या  शिफारशीसाठी ग्राह्य धरले जातील. सुधारित तरतुदींमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना नव्याने चाचणी परीक्षा देणे बंधनकारक राहील. शासनाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांनी पात्र गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीवर अर्ज करायचा आहे.

बदल काय केले?

स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त जागांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. अर्ज भरताना उमेदवारांना प्रवर्ग व विषयाचा विचार करून प्राधान्यक्रम देण्याची मुभा असेल. शैक्षणिक अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारांसाठी प्राधान्यक्रम उपलब्ध असतील. मात्र, प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त ५० प्राधान्यक्रम ‘लॉक’ करता येतील.

सेमी-इंग्रजी शाळांतील शिक्षकांसाठी टीईटी

  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे पदभरती होणार आहे, त्या परीक्षेच्या अर्जाच्या शेवटच्या तारखेप्रमाणे उमेदवारांचे वय ग्राह्य धरले जाईल.
  • तसेच १३ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसार सेमी-इंग्रजी शाळांतील शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि टीईटी परीक्षा अनिवार्य राहील.
  • पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी या शैक्षणिक गटांसाठी शाळेचे माध्यम व त्यानुसार पात्रता विचारात घेतली जाईल.
  • पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ नुसार म्हणजेच टेट संदर्भातील पदभरतीसाठी सुधारित तरतूद लागू असणार आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Revised teacher recruitment process implemented for transparency and efficiency.

Web Summary : Maharashtra's education department introduces revised teacher recruitment rules via the Pavitra portal, prioritizing transparency. Candidates must retake tests, declare preferences, and can select up to 50 school choices. TET is mandatory for semi-English teachers. The new system applies to TET 2025.
टॅग्स :Teacherशिक्षक