शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

नियमित एसटी धावताहेत तब्बल दोन-तीन तास उशिरा, दिवाळीमुळे सोसवेना प्रवाशांचा भार; आरक्षण करणारे प्रवासी ताटकळत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 05:41 IST

ST Bus News: दिवाळीमुळे एसटीला प्रचंड गर्दी हाेत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अनेक गाड्यांच्या दोन-तीन फेऱ्या केल्या जात आहेत. परंतु, नियमित ठिकाणी जाणाऱ्या एसटी सुद्धा इतर मार्गावर पळवल्या जात आहेत.

 पुणे - दिवाळीमुळे एसटीला प्रचंड गर्दी हाेत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अनेक गाड्यांच्या दोन-तीन फेऱ्या केल्या जात आहेत. परंतु, नियमित ठिकाणी जाणाऱ्या एसटी सुद्धा इतर मार्गावर पळवल्या जात आहेत. त्यामुळे गेलेली एसटी येण्यासाठी उशीर झाल्याने पर्यायी एसटी उपलब्ध हाेत नाही आणि नियमित मार्गावर जाणाऱ्या गाड्या तीन-चार तास उशिरा धावत आहेत. त्यामुळे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना बसस्थानकावर बसची वाट पाहत थांबण्याची वेळ आली आहे. एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

पुणे एसटी विभागात आधीच गाड्या कमी आहेत. दिवाळीत इतर आगारांतील तात्पुरत्या स्वरूपात गाड्या मागविण्यात आल्या. परंतु प्रवासीसंख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे बसस्थानकात पाय ठेवायला जागा नाही. परंतु स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारातील वाहतुकीचे नियोजन विस्कटल्याचे चित्र आहे. सकाळी ९ वाजता जाणारी गाडी दुपारी बारा, एक वाजता सोडण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना तीन तास बसची वाट पाहत थांबावे लागत आहे. पुणे विभागात उपलब्ध असलेल्या ८१५ बसपैकी ५२१ बस या दहा वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत. त्यामुळे या बस जीर्ण आणि खिळखिळ्या झाल्या आहेत. परिणामी नागरिकांना दिवाळीचा प्रवास या खिळखिळ्या  बसमधून करण्याची वेळ आली आहे.

पुण्यातून राज्यातील सर्व भागात प्रवासी वाहतूक केली जाते. सध्या दिवाळीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. परंतु वेळेवर गाड्या उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना एक ते दोन तास वाट पाहावी लागत आहे. नवीन बस आणून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाकडून कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.

एसटी प्रशासन ढीम्मवाढत्या गर्दीमुळे योग्य नियोजन करून नियमित गाड्या वेळेवर सोडण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. परंतु गाड्या उपलब्ध नाहीत. गाडीचे काम चालू आहे. गाडी येण्यास वेळ लागला, असे उडवाउडवीची उत्तरे एसटी प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. मात्र प्रवाशांच्या सुरक्षितेकडे एसटीचे दुर्लक्ष होत असून प्रशासनाला याचा काही फरक पडत नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :state transportएसटीPuneपुणे