शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:01 IST

Free Ration: दर महिन्याची फरफट वाचणार; अंत्योदय, प्राधान्य गटांतील नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य सरकारने रेशनकार्ड धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला असून अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातच तीन महिन्यांचे धान्य देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे एप्रिल, मे आणि जून महिन्यांचे धान्य एकाच वेळी एप्रिलमध्ये वितरित केले जाणार आहे.   सरकारच्या नव्या निर्णयानुसार अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातच पुढील तीन महिन्यांचे (एप्रिल, मे, जून) धान्य एकत्र दिले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दर महिन्याला रेशन दुकानात जाण्याची गरज राहणार नाही.

कोणते धान्य किती किलो मिळणार? 

प्राधान्य लाभार्थी गट : प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ, ३ किलो गहू अंत्योदय लाभार्थी गट : कुटुंबाला ३५ किलो धान्य 

लाभार्थ्यांसाठी निर्णय

धान्यवाटपासाठी दुकानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि दुपारी ४ पासून ८ वाजेपर्यंत असेल. त्यामुळे लाभार्थ्यांची उन्हातान्हात वणवण थांबेल, असे रेशन अभ्यासक शैलेश सोनावणे यांनी सांगितले.

ठशाशिवाय रेशन नाही?

रेशन वितरणासाठी ई-पीओएस मशीनद्वारे अंगठ्याचा ठसा (बायोमेट्रिक प्रमाणीकरण) आवश्यक आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहणे गरजेचे आहे. काही ठिकाणी पर्यायी ओटीपी प्रणालीही लागू असू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ration Card Holders to Get Three Months' Worth at Once

Web Summary : Maharashtra government to provide three months' ration in April for Antyodaya, priority groups. Beneficiaries get 2kg rice, 3kg wheat (priority) or 35kg grain (Antyodaya). Distribution: 8 AM-12 PM, 4 PM-8 PM. Biometric authentication required; OTP option may be available.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार