शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
6
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
9
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
10
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
13
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
16
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
17
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
18
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
19
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
20
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगमंत्रीपदाचा सोमवारी देणार राजीनामा - राणे

By admin | Updated: July 17, 2014 17:10 IST

लोकसभा निवडणुकीत मुलाचा पराभव झाल्यापासून काँग्रेसवर नाराज असलेले नारायण राणे हे सोमवारी आपल्या उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत.

ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. १७ - लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलाचा पराभव झाल्यापासून काँग्रेस पक्षावर नाराज असलेले काँग्रेस नेते नारायण राणे हे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा  सोमवारी देणार असल्याची माहिती स्वत: राणे यांनी दिली आहे. 
उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगतानाच आपण पक्ष सोडणार नसून काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे राणे यांनी सांगितले आहे. राणे हे मंत्रीपदाचा राजीनामा देवून भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 
दरम्यान, उद्योगमंत्री नारायण राणे यांना भाजपाने कोणत्याही परिस्थितीत प्रवेश देवू नये, यावेळी भाजपाने युतीचा धर्म पाळावा अशा स्पष्ट शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाकडे मागणी केली आहे. 
राणे हे काँग्रेसमध्ये अस्वस्थ असून ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळातून ऐकायला मिळत आहेत. राणे विरूध्द शिवसेना हे समिकरण गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. सध्या काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या नारायण राणे यांनी भापजामध्ये येण्यासाठी प्रयत्न चालवले असल्याची चर्चा आहे. राणे हे सोमवारी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती असून ते आपल्या उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. मुख्यमंत्रीपद मिळेल या आशेने राणे  काँग्रेसमध्ये आले होते मात्र त्यांचे हे स्वप्न सध्या तरी पूर्ण होईल असे दिसत नाही तसेच आगामी निवडणुकांत राज्यात आघाडीचे सरकार येईल ही शक्यता कमी असल्याने राणे हे भाजपात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमिवर उध्दव ठाकरे यांनी भाजपाकडे मागणी केली आहे. राणे यांना भाजपाने पक्षप्रवेश देवू नये यावेळी भाजपाने युतीचा धर्म पाळावा असे सांगायलाही उध्दव ठाकरे विसरले नाहीत. दरम्यान, राष्ट्रवादीत नाराज असलेले छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेत येणार का? या प्रश्नांवर उध्दव ठाकरे म्हणाले की, शिवसेना भुजबळांना  प्रवेश देणार नाही.