शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलिसांनी दिले माकडाच्या पिलांना जीवदान

By admin | Updated: June 23, 2016 14:44 IST

इगतपुरी रेल्वे स्थानकात मनमाडहुन कुर्लाकडे जाणाऱ्या गोदावरी एक्सप्रेसच्या जनरल प्रवासी बोगीत आढळून आलेल्या चार माकडांच्या पिलांना रेल्वे सुरक्षा बल आधिकाऱ्यांनी जीवदान दिले.

ऑनलाइन लोकमत

इगतपुरी (नाशिक), दि. २३ -  इगतपुरी रेल्वे स्थानकात मनमाडहुन कुर्लाकडे जाणाऱ्या गोदावरी एक्सप्रेसच्या जनरल प्रवासी बोगीत आढळून आलेल्या चार माकडांच्या पिलांना रेल्वे सुरक्षा बल आधिकाऱ्यांनी जीवदान दिले.मनमाड रेल्वे स्थानकातून कुर्ला टर्मिनस मुंबर्इंकडे जाणारी गोदावरी एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकात प्लाटफॉर्म क्रमांक ३ वर येताच इंजिनपासुन २ नंबरच्या प्रवासी बोगीत शौचालया जवळ गोणीत काही तरी हालचाल होत आहे हे पाहुन प्रवासी घाबरले . तेव्हा रेल्वे गाडी तपासणी करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक भुपेंद्र सिंह यांनी प्रवासी का भयभीत झालेत म्हणुन पाहिले असता प्रवाशांनी त्यांना ती हलनारी गोणी दाखिवली.सिंह यांनी सदर घटना रेल्वे सुरक्षा दलाचे निरिक्षक सतीश विधाते यांना दुरध्वनी वरून कळवली असता काही वेळेतच रेल्वे सुरक्षा बल ताफा घटनास्थळी पोहचला व हालणारी गोणी खोलुन पाहिली. तेव्हा त्यात चार माकडाची पिलं त्यात आढळुन आले. सुरक्षा पथकाने हे कुणाचे आहे याची संपुर्ण बोगीत विचारणा केली असता या माकडांचा कोणीच मालक नसल्याने त्यांना रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात आणुन माकडांच्या पिलांना हरबरे आणि काही अन्नपदार्थ देत पाणी पाजले. उत्तर महाराष्ट्रातुन वन्य प्राण्यांची मुंबईला तस्करी करून मोठे घबाड मिळविण्यासाठी काही टोळ्या कार्यरत आहे का याचाही तपास रेल्वे सुरक्षा बल करणार असल्याची माहिती सतिष विधाते यांनी यावेळी दिली.याबाबत रेल्वे सुरक्षा बल निरिक्षक सतिष विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्स्पेक्टर भुपेंद्र सिंह, सुरक्षा कर्मचारी के. पी. बर्वे, जे. पी. पवार, एम. डि. भटकर, डि. एम. पालवे, उदयराज यादव, दगडु कुभांर, आदिंनी तपास करून बेवारस मुद्देमाल गुन्हा नोंद करु न चारही माकडांचे पिलांना इगतपुरी वनविभागाचे वनक्षेत्रपाल अधिकारी रमेश ढोमसे यांच्या ताब्यात देण्यात आले .हे माकडांचे पिलं इगतपुरी येथील घाटनदेवी परिसरात वनविभागाच्या निसर्ग संग्राहालयात सोडण्यात आले आसल्याची माहिती वनविभागाने दिली.