शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर, औपचारिक घोषणा बाकी; मविआकडून अर्ज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 13:05 IST

विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा की नाही यावर चर्चा झाली. त्यात मविआकडून कुणीही उमेदवारी अर्ज भरायचा नाही असं ठरलं

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून कुणीही अध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने नार्वेकर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे त्यामुळे नार्वेकरांच्या निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

मागील २ दिवसांपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असून त्यात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. आज ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकरांनी विधिमंडळ सचिवांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. दिलेल्या मुदतीत केवळ राहुल नार्वेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उद्या ९ डिसेंबरला अधिवेशनात राहुल नार्वेकर यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे.

विधानसभेतील रणनीतीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची सकाळी बैठक पार पडली. त्यात विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा की नाही यावर चर्चा झाली. त्यात मविआकडून कुणीही उमेदवारी अर्ज भरायचा नाही असं ठरलं. त्यात महायुतीकडून राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवडीचा घोषणा उद्या अधिवेशनात होईल. मात्र विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांना २ प्रस्ताव देण्यात आले आहेत त्यात विधानसभेचे उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे यावर सत्ताधारी काय निर्णय घेतात ते पाहावे लागेल.

कोण आहेत राहुल नार्वेकर?

राहुल नार्वेकर हे भाजपाचे कुलाबा मतदारसंघातील आमदार आहेत. २०२२ साली वयाच्या ४५ व्या वर्षी ते विधानसभा अध्यक्ष बनणारे पहिलेच तरुण अध्यक्ष होते. नार्वेकर हे कायद्याचे पदधीवर असून त्यांनी बऱ्याच संस्थांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम केले आहे. राहुल नार्वेकरांच्या राजकीय कारकि‍र्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली, त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले आणि सध्या ते भाजपात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते जावई आहेत. शिवसेना-राष्ट्रवादीतील फुटीनंतर राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी केली होती. आता पुन्हा राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष बनणार आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Narvekarराहुल नार्वेकरvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा