शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधावरून फुलेवाडीत दोन गटांत राडा; सहा गंभीर

By admin | Updated: October 28, 2016 19:58 IST

कामगाराचे घरमालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून शाहू चौक, फुलेवाडी येथे दोन गटांत जोरदार राडा झाला.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 28 - कामगाराचे घरमालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून शाहू चौक, फुलेवाडी येथे दोन गटांत जोरदार राडा झाला. तलवार, लोखंडी गजाचा वापर केल्याने दोन्ही बाजूंचे सहा जण गंभीर जखमी झाले. सुप्रीम सूर्यकांत घाटगे (३२), हणमंत सिद्राम बेन्ने (३०), सूर्यकांत धोंडिराम घाटगे (६०), मोहसीन फारुक मुल्लाणी (२९), शफिन फारुक मुल्लाणी (३२), मुन्ना लालासाहेब जमादार-काणीरे (३०), नितीन श्रीकांत सावंत (२६) अशी जखमींची नावे आहेत. शुक्रवारी भरदुपारी झालेल्या राड्यामुळे परिसरात तणाव पसरला. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. यावेळी दोन्ही गटांच्या नातेवाईक, मित्रांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत संशयितांचे अटकसत्र सुरू होते.जखमी सुप्रीम घाटगे याने पोलिसांना सांगितले, मी भगवा चौक, फुलेवाडी येथे चायनीजचा गाडा चालवितो. वडील व्यवसाय करतात. भाऊ खासगी वाहनावर चालक आहे. माझा मित्र हणमंत बन्ने (रा. लक्ष्मीनारायण कॉलनी, फुलेवाडी) हा मार्केट यार्ड येथे नोकरी करतो. त्याचा गुरुवारी मध्यरात्री मला फोन आला. घरमालकाच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून अल्लाबक्ष मुल्लाणी, मोहसीन मुल्लाणी, शफिन मुल्लाणी, नितीन सावंत यांनी मला मारहाण केली आहे. तू ताबडतोब ये, असे सांगितले. मी रात्री दोनच्या सुमारास तो राहत असलेल्या खोलीवर गेलो. तू एकटा आहेस, माझ्या घरी चल, म्हणून मी त्याला घरी घेऊन आलो. दरम्यान, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास चायनीज गाडी सुरू करण्यासाठी रिक्षातून (एम.एच.०७ एबी-८५६५) साहित्य घेऊन जात असताना रणजित घोरपडे व नितीन सावंत मोटारसायकलवरून माझ्या घरी आले. त्यांनी हणम्या कुठे आहे, अशी विचारणा केली. मी घरी आहे, असे सांगताच त्याला बाहेर बोलव, रात्रीचे प्रकरण मिटवायचे आहे, असे रणजित घोरपडे म्हणाला. त्यावर मी भांडणे नको, आम्ही त्याला घेऊन येतो, असे बोललो. त्यानंतर माझ्या रिक्षातून वडील, भाऊ व हणमंत बन्ने असे चौघेजण आम्ही शाहू चौकात आलो. याठिकाणी मोहसीन मुल्लाणी, शफिन मुल्लाणी, अल्लाबक्ष मुल्लाणी, मुन्ना जमादार-कानिरे, जावेद (पूर्ण नाव नाही), रणजित घोरपडे, नितीन सावंत यांच्यासह पंधराजण थांबले होते. रिक्षातून उतरल्यानंतर मोहसीनने आम्हाला तुम्ही मध्ये पडू नका, अशी दमदाटी केली. मी काय बोलायचे आहे ते आमच्यासमोर बोला, असे म्हणताच त्याने माझ्या कानशिलात लगावली. त्यानंतर वादावादी होऊन गोंधळ उडाला. यावेळी मोहसीनने चौकातील मंडळाच्या कट्यामागे लपविलेल्या तलवारी, लोखंडी गज काढून माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर दोन्ही गटांत जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटांत झालेल्या राड्यामध्ये रिक्षासह दुचाकी वाहनांची तोडफोड केली. फुलेवाडी शाहू चौकात भरदिवसा घटना घडल्याने परिसरात तणाव पसरला. जखमींना सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक आर. पी. भूतकर व त्यांचे सहकारी आले. त्यांनी जखमींची विचारपूस करून सुप्रीम घाटगे याचा जबाब घेतला. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.