शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील नव्या जिल्ह्यांचे प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी तर चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा नवा जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र या मागणीकडे राज्य सरकारचे

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी तर चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा नवा जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी  गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र या मागणीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.शुक्रवारी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्याचे १५ ऑगस्टपूर्वी विभाजन करण्यात येईल, अशी घोषणा  विधान परिषदेत केली. राज्य सरकार विदर्भातील नव्या जिल्ह्यांच्या निर्मिती प्रस्तावावर उदासीन आहे. आजवर अनेकदा अहिंसात्मक मार्गाने आंदोलन  करून जिल्हा निर्मितीची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून करण्यात आली. परंतु सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला  नाही. गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे. या जिल्ह्यात अहेरी उपविभाग नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील आहे. ही बाब लक्षात घेऊनच राज्याच्या  गृहमंत्रालयाने स्वतंत्र अहेरी जिल्हा तीन वर्षापूर्वीच घोषित केला. मात्र महसूल प्रशासन याबाबत उदासीन आहे. नवा जिल्हा निर्माण करण्याऐवजी  अहेरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी देण्यात आला व जिल्हा निर्मितीची मागणी दाबून टाकण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. नाग विदर्भ आंदोलन  समितीसह अहेरी जिल्हा निर्माण संघर्ष कृती समितीने या प्रश्नावर सातत्याने जनआंदोलन केले आहे. अहेरी उपविभागात असलेल्या पाच तालुक्यांसह आणखी सहा नवीन तालुके निर्माण करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा १५ ऑगस्ट २0१४ ला घोषित  करावा, अशी मागणी अहेरी परिसरातील जनतेने केली आहे.राज्य सरकारने गेल्या अनेक  वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा नवीन जिल्हा निर्माण करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.  मुख्यमंत्र्यांनी चिमूरला जिल्ह्याचा दर्जा देण्याऐवजी नगर परिषद करण्यात येईल, अशी घोषणा एका कार्यक्रमात केली होती. मात्र नगर परिषद न करता  नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला. चिमूर ही क्रांतिभूमी असल्याने स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा, अशी चिमूरवासीयांचीही मागणी आहे. परंतु  राज्य सरकार विदर्भातील नव्या जिल्ह्याच्या निर्मितीबाबत उदासीन आहे. (जिल्हा प्रतिनिधी)